घरट्रेंडिंगCorona Symptoms: लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत कोरोनाची 'ही' लक्षणे, जाणून घ्या

Corona Symptoms: लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत कोरोनाची ‘ही’ लक्षणे, जाणून घ्या

Subscribe

लहान मुलांना व्हायरल इंन्फेक्शनचा धोका सर्वात लवकर जाणवतो.

कोरोनाच्या व्हायरच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा मोठा धोका संभावतो आहे. देशभरात लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मुलांमध्ये कोरोनाच्या नियमांचे योग्य पालन होत नाही त्याचप्रमाणे मधल्या काळात लहान मुलांचे बाहेर खेळणे, सोशल डिस्टन्स्टसिंगचे नियम न पाळणे यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याचे सांगितले जात आहे. मायो क्लिनिकने लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या कोरोनाची काही लक्षणे सांगितली आहेत. काय आहेत ती लक्षणे जाणून घ्या.

बदलच्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. लहान मुलांना व्हायरल इंन्फेक्शनचा धोका सर्वात लवकर जाणवतो. मात्र लहान मुलांमध्ये आढणाऱ्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये ही लक्षणे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या घशात खवखव होणे,श्वास घेण्यास त्रास होणे, डोके दुखणे ही लक्षणेही लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्येही शरिर दुखणे, अशक्तपणा अशी त्याचप्रमाणे उलटी,जुलाब ही लक्षणे देखिल आढळून येत आहेत. चव न समजणे,वास न येणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आल्याला पहिल्यापासून सांगण्यात येत आहेत. लहान मुलांमध्येही ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे जर लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसून येत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मुलांमध्ये अशी लक्षणे दिसून आली तर मुलांना स्वतंत्र खोलीत ठेवा. बाहेरील व्यक्ती किंवा वातावरणापासून मुलांना लांब ठेवणे गरजेचे आहे.


हेही वाचा – मला कोरोना झाला पण समजलचं नाही हे कसं ओळखायचं? जाणून घ्या ‘ही’ ५ लक्षणे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -