Corona Vaccination: कुणी झाडावर चढलं, तर कुणी कर्मचाऱ्यालाच धोपटलं, कोरोना लस टाळण्याचा ड्रामा पाहाच

Corona Vaccination general a lot of drama about not getting corona vaccination some climbed the tree and some scuffled with the staff view video
Corona Vaccination: कुणी झाडावर चढलं, तर कुणी कर्मचाऱ्यालाच धोपटलं, कोरोना लस टाळण्याचा ड्रामा पाहाच

देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेबाबत अनेक लोकं जागरुक आहेत, परंतु अजूनही काही लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत दहशत पसरली आहे. जेव्हा अशा लोकांसमोर लस देण्यासाठी आरोग्य कर्मचारी जातात, तेव्हा ते तिथून पळ काढतात. देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात प्रत्येक दिवशी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच दोन व्हिडिओ उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यातून समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकं विचित्र प्रकारे कोरोना लसीला विरोध करताना दिसत आहेत.

कोणी झाडावर चढला, तर कोणी नदीत उडी मारली

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लसीपासून वाचण्यासाठी कोणी व्यक्ती झाडावर चढत आहे, तर कोणी नदीत उडी मारत आहे. हे व्हिडिओ बलिया जिल्ह्यातील रेवती ठाणा क्षेत्रातील आहे आणि हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशचा बलियामधील पहिल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोरोना लसीचा डोस न देण्यासाठी जिद्द करताना दिसत आहे. यादरम्यान या व्यक्तीने लस देणाऱ्या आलेल्या टीमच्या एका सदस्याला मारहाण केली. पण व्यक्ती नंतर लस घेण्यासाठी तयार झाला. तसेच दुसऱ्या व्हिडिओ बलिया जिल्ह्याचाच आहे. यामध्ये एक व्यक्ती कोरोना लस न घेण्यासाठी झाडावर चढला. त्यानंतर प्रशासनाने त्याला झाडावरून उतरवून डोस दिला. पण देशातील अशा चित्रामुळे कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज कधी दूर होणार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: आता X-raysच्या माध्यमातून कोरोना, ओमिक्रॉनची लागण झालेय की नाही कळणार, वैज्ञानिकांचा नवा शोध