घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना पॉझिटिव्ह नर्स 45 दिवस होती कोमात; पण Viagra ने...

Coronavirus : कोरोना पॉझिटिव्ह नर्स 45 दिवस होती कोमात; पण Viagra ने वाचवले प्राण

Subscribe

मोनिकाला बरं करण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अशावेळी डॉक्टरांना उपचारांची एक वेगळी कल्पना सुचली

कोरोना संसर्गामुळे कोमात गेलेल्या एका महिला नर्सचे Viagra ने प्राण वाचले आहेत. पेशाने नर्स असलेल्या 37 वर्षीय मोनिका अल्मेडा 45 दिवस कोमात होती. मात्र डॉक्टरांनी व्हायग्राच्या मदतीने तिला कोमातून सुखरुप बाहेर काढले आहे. व्हायग्राच्या मदतीने मोनिका हिचे प्राण वाचवण्याची अद्भुत कल्पना तिच्या सहकाऱ्यांचीच होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका अल्मेडा ही इंग्लंडमधील गेन्सबोरो लिंकनशायर येथील रहिवासी आहे. गेल्या 45 दिवस ती कोमात होती. मात्र जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. यावेळी मोनिकाला इरेक्टाइल डिसफंक्शन औषध दिले जायचे. मात्र तिच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी निम्म्याहून कमी झाली होती. तर दिवसेंदिवस ही पातळी आणखीनच खालावत होती. यावर मोनिका म्हणाली की, मी शुद्धीवर आले तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितले की, मला व्हायग्राच्या मदतीने शुद्धीवर आणण्यात आले आहे. सुरुवातीला डॉक्टर विनोद करतायत असे मला वाटले. पण प्रत्यक्षात मला व्हायग्राचा हेवी डोस देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मोनिका ही NHS लिंकनशायरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होती. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली. हळूहळू तिची प्रकृती अधिकचं खालवत गेली. आणि रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या. यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. रुग्णालयात बरे होत तिला लवकरचं डिस्चार्जही देण्यात आला. मात्र घरी जाताच मोनिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी तिने थेट लिंकन काउंटी हॉस्पिटल गाठत उपचार सुरु केले. यादरम्यान तिची ऑक्सिजन पातळी सतत घसरत होती. त्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. यात १६ नोव्हेंबरला ती कोमात गेली.

मोनिकाला बरं करण्यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. अशावेळी डॉक्टरांना उपचारांची एक वेगळी कल्पना सुचली. या कल्पनेनुसार मोनिकावर व्हायग्रा औषधाने उपचार सुरु करण्यात आले. मुळात व्हायग्राच्या वापराने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. व्हायग्रा फुफ्फुसांमध्ये फॉस्फोडीस्टेरेढ एंजाइम तयार करते आणि रक्तवाहिन्यांमध्य़े पसरवते. ज्यामुळे फुफ्फुसांना आराम मिळतो.

- Advertisement -

यावर मोनिका म्हणाली की, व्हायग्रा औषधामुळेच माझे प्राण वाचले. 48 तासांत माझी फुफ्फुसं काम करु लागली. मला दमा आहे. त्यामुळे माझी ऑक्सिजन पातळी सतत कमी जास्त होत राहते. मात्र आता मोनिका पूर्वीपेक्षा बरी असून तिच्यावर घरीच पुढील उपचार सुरु आहे.


‘शनी’च्या राशीत ‘सूर्या’चा प्रवेश; आता ‘या’ 5 राशीच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -