सेक्स करताना सावधान! नाहीतर तुम्हालाही होऊ शकतो कोरोना…

coronavirus infection found in sperm sexual relation can spread virus
सेक्स करताना सावधान! नाहीतर तुम्हालाही होऊ शकतो कोरोना...

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. काही देशांमध्ये लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या विषाणूच्या लक्षणांविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. शिंकणे आणि खोकणे यामुळे कोरोनाचा फैलाव जास्त होऊ शकतो, असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितले आहे. मात्र आता अलीकडेच संशोधनातून कोरोनाबाबत धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. संशोधनानुसार, शारिरीक संबंध ठेवल्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. तसेच यामुळे कोरोना फैलाव वाढू शकतो असे देखील सांगण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या पुरुषांनी जर शारिरीक संबंध ठेवले तर संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

माहितीनुसार, चीनमधील शांगक्यू म्युनिसिपल हॉस्पिटमध्ये दाखल झालेल्या एकूण ३८ रुग्णांपैकी ६ रुग्णांच्या शुक्राणूमध्ये कोरोनाचे विषाणूचा संसर्ग आढळले आहे. दरम्यान संशोधकांनी असे म्हटले आहे की, शारिरीक संबंध ठेवल्यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे शारिरीक संबंध ठेवताना काळजी घ्या.

आता शुक्राणूमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यामुळे काही संशोधनकांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोरोनाची पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीने एखाद्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्याच्या जोडीदारलाही कोरोनाची लागण होऊ शकते.


हेही वाचा – CoronaVirus:…म्हणून मुंबईत ५० हजार रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था