होळीमुळे होऊ शकतो ‘कोरोनाचा स्फोट’, तज्ज्ञांचा इशारा

happy holi 2022 not only in india special type of holi are celebrated in these 8 countries of the world
होळी

देशात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा पून्हा कामाला लागली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 1,57,157 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता आरोग्य तज्ज्ञांकडूनही गंभीर इशारा दिला आहे. या आरोग्य तज्ज्ञांच्या इशाऱ्यानुसार, देशात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी न घेतल्यास यंदाच्या होळी सणामुळे ‘कोरोनाचा स्फोट’ होऊ शकतो.

देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा राज्यांमध्यो कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या राज्यांतील नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कोरोनाचे उद्रेक होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत ३,७५३ रुग्ण बरे झाले असून ६२ जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे सध्या २१ लाख ५५ हजार ७० नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोना रुग्ण संख्या वाढतेयं कारण या राज्यांमध्ये सामाजिक मेळावे. जाहीर सभा, बैठका मोठ्याप्रमाणात होत आहेत. यासह देशात कोरोनाचा नवा स्ट्रेनही समोर आला असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये नागरिकांनी कोरोनाबाबत निष्काळजीपम दाखवला तर कोरोना रुग्णसंख्या रेकॉर्डब्रेक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळावे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणादरम्यान काळजी घेणे. कारण होळी सणात सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नाही त्यामुळे होळी कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरु शकतो. होळीच्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी होळी साजरा करतानाच केंद्राने दिलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचं आहे. कारण देशावरील कोरोनाचे संकट अद्याप हटलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी होळीचा आनंद साजरा करताना एकमेकांना हात मिळवणे, मिठी मारणे टाळावे. तसेच विनामास्क गर्दीच्या ठिकाणी जावू नका. सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करा. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


हेही वाचा- Assembly Elections 2021- मोदींच्या लसीकरणापेक्षा पेहरावाचीच चर्चा