घरट्रेंडिंगमोदींनी ३ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन; ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मिम्सचा धुमाकूळ

मोदींनी ३ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन; ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मिम्सचा धुमाकूळ

Subscribe

ट्विटरवर लॉकडाऊन हा ट्रेंड सध्या टॉपला असून #Lockdown2 या हॅशटॅगचा वापर नेटकरी करत आहेत

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केला होता, त्या लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस होता. मात्र या दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊन संबंधित पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत कायम राहिल अशी घोषणा केली. दरम्यान सोशल मीडियावर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. यामध्ये ट्विटरवर लॉकडाऊन हा ट्रेंड सध्या टॉपला असून #Lockdown2 या हॅशटॅगचा वापर नेटकरी करत आहेत. या हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकरी मिम्स आणि जोक्स तयार करत चांगलेच व्हायरल करत आहेत.

लॉकडाऊनच्या नव्या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर दिल्या अशा प्रतिक्रिया

- Advertisement -

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना असे सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक राज्यावर बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे जे जिल्हे २० एप्रिलपर्यंत कोरोनाला आळा घालतील तेथील नियम शिथिल करण्यात येतील. त्यामुळे आता प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे की, आपल्या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला पाहिजे.


PM Narendra Modi Live: मोदींच्या भाषणातील सर्व मुद्दे; वाचा सविस्तर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -