video: आमिर खान-राणीच्या ‘गुलाम’मधील बाईक किसचा स्टंट दिल्लीत पुन्हा एकदा

दिल्लीमध्ये असाच एक प्रकार एका जोडप्याने केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राणी मुखर्जी आणि आमिर खान यांचा गुलाम चित्रपट तुम्हाला आठवतोय का? १९९८ साली सर्वत्र प्रदर्शित झालेला गुलाम या चित्रपटातील जादु है तेरा जादू हे गाणं खूप सुपरहीट ठरले होते. या गाण्याच्या चित्रिकरणात आमिर खान आणि राणी मुखर्जी दिसतात. ते दोघे एका गाडीवर एकत्र दिसले होते. यात राणी मुखर्जी गाडीच्या इंधनाच्या टाकीवर आमिरच्या पुढे बसल्याचे दिसते.

दिल्लीमध्ये असाच एक प्रकार एका जोडप्याने केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राणी आणि आमिर प्रमाणे या जोडप्याने दिल्लीतील रहदारी तसेत ट्राफिक असणाऱ्या वेळात स्टंट केला. दिल्लीतील पश्चिमेस असणाऱ्या राजौरी गार्डन येथे भरपूर ट्राफिक असणाऱ्या वेळात या जोडप्याने गुलाम चित्रपटातील गाण्याप्रमाणे स्टंट केल्याचे समोर आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात व्हायरल केला.

हा व्हिडिओ ट्विटर युजर्स आयपीएस एचजीएस धालीवाल यांनी शेअर केला. त्यांनी या व्हिडिओला शेअर करताना Need for new sections for #MV Act violations!! #Rajouri garden crossing. असे कॅप्शन दिले.

या व्हिडिओमध्ये दिसणारी जोडी चित्रपटात दाखवल्या प्रमाणे गातांना दिसत आहे. ते आपल्या प्रेमाचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी अशा चुकीच्या पद्धतीने स्टंट करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.