घरट्रेंडिंगLockDown: वडिलांच्या या कल्पनेमुळे मुलीच्या चेहऱ्यावर आला आनंद!

LockDown: वडिलांच्या या कल्पनेमुळे मुलीच्या चेहऱ्यावर आला आनंद!

Subscribe

प्रत्येक वडील आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे या वडिलांनी आपल्या मुलगी निराश होऊ नये याकरिता एक भन्नाट कल्पना केली.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाच्या संकटामुळे आपली जीवनशैली बदलली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. तसंच आता मास्क जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. या कोरोनाच्या संकटामुळे अनेक देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडता येत नाही आहे. शाळा, कॉलेज मॉल्स इत्यादी सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एक विद्यार्थीने ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ सुद्धा निराश झाली आहे. कारण लॉकडाऊनमुळे ग्रॅज्युएशन सेरेमनी रद्द झाली आहे. परंतु या विद्यार्थीनीच्या वडीलांनी तिच्यासाठी एक भन्नाट कल्पना केली आणि आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.

गॅब्रिएल पियर्स (Gabrielle Pierce)ने लुझियानाच्या झेवियर युनिवर्सिटीमध्ये चार वर्ष शिकत होती. पण जेव्हा डिग्री घेण्याची वेळ आली तेव्हा लॉकडाऊनमुळे तिची कॉलेजच्या स्टेजवर जाण्याची संधी हुकली. म्हणून गॅब्रिएलचे वडील टॉरेन्स बर्सन (Torrence Burson) यांनी तिला निराश होऊ दिले नाही. त्यांनी घराजवळील मोकल्या जागेत स्वतः ग्रॅज्युएशन सेरेमनी आयोजित केला. त्यांनी खर्‍या सेरेमनीसारखे करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

या वडीलांच्या भन्नाट कल्पनेमुळे सोशल मीडियावर नेटकरी त्याचे कौतुक करत आहे. काही लोकांनी टॉरेन्सला ‘बेस्ट डॅड’ म्हणून टायटल दिले आहे. तर काहींनी मुलगी लकी असल्याचे म्हणाले.

- Advertisement -

 


हेही वाचा – CoronaVirus: ३ वर्षाच्या चिमुकल्याने कप केक्स विकून पोलिसांसाठी ५० हजारांचा गोळा केला निधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -