घरट्रेंडिंगमहाराष्ट्रातून दिग्गज जाऊनही दिल्लीत भाजपची पिछेहाट

महाराष्ट्रातून दिग्गज जाऊनही दिल्लीत भाजपची पिछेहाट

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांची झाडू चालली असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यश आले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांची झाडू चालला असून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे, दिल्लीचे सरताज तिसऱ्यांदा अरविंद केजरीवालच ठरले. दिल्ली निवडणूक ही भाजपने प्रतिष्ठेची केली होती. तसेच या निवडणुकीमध्ये भाजपने आपले दिग्गज नेते मैदानात उतरवले होते. या दिग्गजांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना देखील प्रचारात उतरवले होते. मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचार करूनही दिल्लीत भाजपचा पराभव झाला.

त्यामुळे, आता राज्यातील भाजपचे विरोधक भाजपवर टीका करताना पहायला मिळत आहे. दरम्यान,अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तर जितके महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले तितक्या भाजपला जागाही निवडून आल्या नसल्याची टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील हे माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी उतरवले असले तरी देखील दिल्लीची जनता केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह २५ जणांवर दिल्ली निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, तरी देखील भाजपचा दिल्लीत सुपडा साफ झाला आहे. विशेष बाब म्हणजे या प्रचारादरम्यान भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दारोदारी जाऊन टेम्पलेट वाटल्याचा फोटो देखील व्हायरल झाला. मात्र, आता याची देखील सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून, विरोधक देखील भाजपवर टीका करत आहे. राज्यातून जे २५ जण दिल्लीमध्ये गेले होते त्यांच्याकडे एकूण १० विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.

आमच्या पराभवाचे एकमेव कारण म्हणजे काँग्रेसने आपली सर्व वोटबँक आम आदमी पार्टीकडे शिफ्ट केली. हा प्रयोग आता देशभर चालला आहे. ज्या दिल्लीमध्ये १५ वर्षे शिला दिक्षीत मुख्यमंत्री होत्या. त्या दिल्लीत भाजपची एकही जागा येत नाही याचा अर्थ आणखी वेगळा काय असू शकतो. 

चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -