घरट्रेंडिंगकाय सांगता! गटारी अमावस्येनिमित्त शिवसैनिकांचं अल्प दरात चिकन वाटप

काय सांगता! गटारी अमावस्येनिमित्त शिवसैनिकांचं अल्प दरात चिकन वाटप

Subscribe

८ ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर येथे सकाळी ९ ते ११ वेळेत अल्प दरात चिकन विक्री होणार

आषाढ महिना संपण्याच्या वाटेवर आहे. येत्या रविवारी गटारी अमावस्या आहे. गटारी म्हणजे तळीरामांसाठी मोठा सण मानला जातो. याचाच फायदा घेऊन विरारमध्ये शिवसैनिकांनी चांगलीच शक्कल लढवल्याचे दिसून आलेय. विरार पूर्व साईनाथ नगर येथे खास गटारी अमावस्येनिमित्त शिवसैनिकांनी अल्प दरात चिकन वाटपाचा कार्यक्रम होती घेतलाय. (
Distribution of chicken at low rates to Shiv sena on the occasion of Gatari Amavasya in virar)  साईनाथ नगर येथे जागोजागी अशाप्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या २३० ते २४० प्रति किलो चिकनचा भाव आहे. मात्र शिवसैनिकांनकडून हेच चिकन प्रति व्यक्ती १८० रुपये किलोने देण्याचे बॅनर लावण्यात आलेत. गटारीच्या संधीचा फायदा घेत शिवसैनिकांनी चांगलीच जाहिरातबाजी केलेली पहायला मिळत आहे. बॅनरवर शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आलेत.

येत्या रविवारी गटारी अमावस्या आहे. ८ ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर येथे सकाळी ९ ते ११ वेळेत अल्प दरात चिकन विक्री होणार आहे. १८० रुपये किलो प्रति व्यक्ती १ किलो चिकन विकत घेता येईल. मात्र चिकनसाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार. नोंदणीसाठी काही नंबर देखील देण्यात आलेत. सध्या सोशल मीडियावर या चिकन वाटपाची जोरदार चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

वसई विरार निवडणूकीचे वेध लागलेले असतानाच निवडणूकीसाठी काय पण असे म्हणत शिवसैनिकांनी चालवलेली शक्कल चांगलीच व्हायरल होत आहे. एकीकडे राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीत मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक गटारीचा फायदा घेत अल्प दरात चिकनची विक्री करत आहे. येत्या महापालिकेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या स्टंटबाजीचा सर्वत्र बोलबाला सुरू असल्याचे दिसत आहे. याआधी देखील आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीमध्ये १ रुपये प्रति लिटरने पेट्रोल विक्री करण्यात आली होती.


हेही वाचा – ‘बचपन का प्यार’ गाणं नेमकं आलं कुठून? पहा बचपन का ओरिजिनल प्यार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -