Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग ...म्हणूनच सापाला असतात दोन जीभ! जाणून घ्या त्यामागचं कारण

…म्हणूनच सापाला असतात दोन जीभ! जाणून घ्या त्यामागचं कारण

Related Story

- Advertisement -

माणसांसह बर्‍याच प्राण्यांना देखील जीभ असते, परंतु सापाची जीभ दोन भागात का विभागलेली असते? या प्रश्नामुळे अनेक काळापासून वैज्ञानिक आणि जीवशास्त्रज्ञांना अडचणी आल्यात. सापाच्या जीभाच्या दोन भागांचे कार्य नेमके काय असते?, साप त्यांची दोन भागात विभागलेली जीभ नेहमी हवेत घेऊन वेगवेगळ्या दिशेने फिरत असतात. सापाच्या दोन जीभेचा संबंध माणसाच्या दोन कान आणि दोन नाकपुड्यांशी काही संबंध आहे काय? की त्याला खाण्यापिण्याची चव अधिक यावी म्हणून आहे? जाणून घ्या सापाची जीभ दोन भागात विभाजित होण्याचे कारण नेमके काय आहे.

कनेक्टिकट युनिव्हर्सिटीच्या इकोलॉजी अँड इव्होलॉशनरी बायोलॉजीचे प्राध्यापक कर्ट श्वेंक या संदर्भात अशी माहिती देतात की, सापाच्या जीभेचे दोन भाग होण्याची कहाणी डायनासोरच्या काळापासून सुरू असून हे सुमारे १८ कोटी वर्षांपूर्वीचे आहे. साप आपल्या मोठ्या आणि भितीदायक नातेवाईकांच्या पायाखाली जाऊ नयेत, म्हणून ते मातीच्या खड्ड्यात किंवा बिळात लपून बसतात. सापाचे शरीर लांब, पातळ आणि दंडगोलसारखे असते. त्यांना पाय नसतात. प्रकाशाशिवाय त्यांची दृष्टी अस्पष्ट होते. सापाची जीभ नाक म्हणून कार्य करत असते. ते वास घेण्याकरिता जीभ हवेत फिरवत असतात.

- Advertisement -

फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ बर्नार्ड जर्मेन डे लेसेपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिस्टॉटलचे असे मत होते की, सापांना दुप्पट चव चाखायला मिळावी म्हणून त्यांची जीभ दोन भागात विभागलेली असते. १७ व्या शतकातील निसर्गवादी आणि विश्वशास्त्रज्ञ जियोव्हानी बॅटिस्टा होडिर्ना यांनी असे सांगितले की, साप त्यांच्या दोन जिभेने धूळ उचलतात. कारण त्यांना सतत जमिनीवर रेंगावं लागतं. त्याच वेळी, इतर वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की साप आपल्या जिभेने कीटक आणि पतंग देखील पकडतात. सापाच्या दोन भागात विभागलेल्या जीभेची खरी कामे १९०० नंतर ओळखली गेली. या सापाच्या जीभला व्होमेरोनाझल अवयव असे म्हटले जाते. हा अवयव अशा अनेक जीवांमध्ये आढळतो जो जमिनीवर सरपटतो किंवा रेंगाळतो. बरीच सस्तन प्राणी देखील यामध्ये येतात. हे केवळ वानर आणि मानवांच्या पूर्वजांमध्ये आढळले नाही. व्होमेरोनाझल अवयवामुळे सापाला पुढे काय आहे ते किंवा काय घडू शकते हे कळते.


चिंतेत भर! २९ देशांमध्ये पसरलायं कोरोना नवा व्हेरियंट, WHO ने व्यक्त केली भीती

- Advertisement -