घरट्रेंडिंगबापरे! महिलेच्या तोंडातून निघाला ४ फूटाचा साप!

बापरे! महिलेच्या तोंडातून निघाला ४ फूटाचा साप!

Subscribe

या घटनेनंतर रशियाच्या दागेस्तान येथील प्रशासनाने लोकांना घराबाहेर झोपायला केली मनाई

उघड्या तोंडाने झोपण्याचे किती वाईट दुष्परिणाम होऊ शकतात हे, रशियाची महिला नक्की सांगू शकेल. या महिलेच्या उघड्या तोंडाला बीळ समजून हा साप तिच्या तोंडात गेला. जेव्हा महिलेल्या श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला, तेव्हा ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या घशाची तपासणी केली. यावेळी त्यांनी तिच्या तोंडाद्वारे घशात एक पाईप टाकून त्या सहाय्याने या सापाला तोंडातून बाहेर काढले.

डेली मेलच्या वृत्तानुसार, रशियाच्या दागेस्तानमधील लेवाशी गावात राहणारी एक महिला आपल्या घराच्या बागेत झोपली होती. तिचे तोंड उघडे होते. अशा परिस्थितीत चार फूट लांब पातळ साप तिच्या तोंडातून तिच्या शरीरात गेला. त्या महिलेने काही केले नाही तेव्हापर्यंत हा साप तिच्या घशामध्येच होता. महिलेची प्रकृती वेगाने खालावत होती. तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. तेव्हा तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

महिलेस त्वरित इमरजेंसीमध्ये नेण्यात आले आणि जनरल एनेस्थीसिया देण्यात आले. म्हणजे तिला बेशुद्ध केले गेले. यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या घशात व्हिडिओ कॅमेरा आणि लाईट ट्यूब टाकली. जेणेकरून महिलेच्या शरीरात साप किती आत गेला आहे हे लक्षात येईल. आश्चर्याची बाब म्हणजे डॉक्टरांनी त्याच ट्यूबद्वारे सापाचा एक भाग पकडला आणि हळू हळू त्याला बाहेर खेचून काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असलेले वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या सापाला महिलेच्या तोंडातून बाहेर काढले. या सापाची लांबी बघताच ते थक्क झाले. महिला वैद्यकीय कर्मचार्‍याच्या चेहऱ्यावर भीतीची भावना दिसून येते आहे. त्यानंतर सापाला बादलीमध्ये ठेवले जाते. परंतु हा साप जिवंत बाहेर काढण्यात आला की मेलेला हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेनंतर रशियाच्या दागेस्तान येथील प्रशासनाने लोकांना घराबाहेर झोपायला मनाई केली आहे. कारण तेथे बरेच साप बाहेर येण्याचे प्रकार घडत आहेत. या महिला रूग्णाची किंवा सापाच्या प्रजातीविषयीही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


‘या’ राज्यात लॉकडाऊन संपला; कंटेनमेंट झोन वगळता Unlock 4 मध्ये कोणतेही बंधन नाहीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -