हेल्मेट वापरल्याने केस गळतात का ?

नाशिक : तत्कालिन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशकात केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे अनेक वाद उद्भवले. पंरतु, अपघातात सुरक्षेसाठी हेल्मेट गरजेचेच असल्याचे आजवर अनेकदा अधोरेखित झाले. तरीदेखील सद्यस्थितीत अनेक वाहनचालक बदली होण्यापूर्वी त्यांनी केलेला हेल्मेट सक्ती मुळे बरेच वाद निर्माण झाले होते. आता त्यांची बदली झाल्यानंतर दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट कडे पुन्हा पाठ फिरवायला सुरू केले असल्याचे दिसते. हेल्मेट वापरण्याचा मूळ उद्देश हा सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट का वापरत नाही? असा प्रश्न नागरिकांना विचारला असता हेल्मेटमुळे केस गळती होते, श्वास घ्यायला त्रास होतो, गरम होते, घाम येतो असे अनेक कारणं समोर आले. पण खरंच असं होतं का? याचा आढावा ‘माय महानगरने’ घेतला आहे.

“हेल्मेटचा वापर यामुळे केस गळती होते हा पूर्णतः गैरसमज आहे. सहसा आपण हेल्मेट दररोज अर्धा ते एक तासासाठी वापरतो त्यामुळे केस गळती होत नाही. पण जर हेल्मेटचा वापर दररोज पाच ते सहा तासांसाठी होत असेल तर केस गळतीची शक्यता असते. बर्‍याच वेळा केस गळती अनुवांशिक किंवा हार्मोन्स मुळे होऊ शकते. आयएसआय मार्क असलेले, चांगल्या कंपनीचे, उत्तम प्रतीचे हेल्मेट बाजारात उपलब्ध आहेत. जे त्वचेपर्यंत हवा खेळती राहण्यास मदत करतात. ज्यामुळे केस गळती किंवा श्वसनास होणारा त्रास या समस्या येत नाहीत” : एमडी फिजिशिअन, वैभव पाटील

“हेल्मेट मुळे केस गळती होते हा लोकांचा गैरसमज आहे. चांगल्या प्रतीचे हेल्मेट वापरल्यास असे प्रश्न उद्भवणार नाही. पण स्वच्छता ठेवणे हे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात येणार्‍या घामामुळे बॅक्टेरिया तयार होतात व त्यामुळे केस गळती होऊ शकते. पण डोक्याच्या त्वचेची व हेल्मेटच्या आपल्या भागाची नीट स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. हेल्मेटच्या आट टोपी किंवा रुमाल बांधू शकतात. त्यामुळे केसांची मुळं धुळीपासून, दूषित हवेपासून सुरक्षित राहतात. तसेच चेहर्यावरील त्वचेचे ही धुळीपासून संरक्षण होते.” : ब्युटीशिअन, ललिता पाटोळे