Video : बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स; कंडक्टर आणि ड्रायव्हर निलंबित

दिल्लीच्या डीटीसी बसमध्ये हॉट डान्स करणाऱ्या तरुणीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ जेव्हा डीटीसी प्रशासनाकडे गेला तेव्हा प्रशासनाने बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला निलंबित केले आहे.

dtc bus suspend driver and conductor due to show in video of dancing girl
बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स; कंडक्टर आणि ड्रायव्हर निलंबित

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा बसमध्ये हॉट डान्स करण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बस कंडक्टर आणि ड्रायव्हर देखील आहेत. कंडक्टर आणि ड्रायव्हर तरुणीसोबत नाचत जरी नसले तरी ते डान्स करणाऱ्या तरुणीसोबत व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तरुणी त्यांच्या अवतीभोवती डान्स करत आहे. तर हे दोघे हसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओचा मोठा फटका बस ड्रायव्हर आणि कंडक्टरला बसला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बस प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे.

दिल्लीच्या डीटीसी प्रशासनाने केली कारवाई

दिल्लीमध्ये ‘दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ (डीटीसी) ही नागरी बससेवा आहे. या बसमध्ये सपना चौधरीच्या गाण्यावर एका तरुणीने हॉट डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, डीटीसी प्रशासनाला यावर निर्णय घ्यावा लागला. अखेर डीटीसी प्रशासनाने बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांना निलंबित केले आहे.


हेही वाचा – जेसीबीच्या खुदाईनंतर आता जेसीबीचा नागिन डान्स; व्हिडिओ व्हायरल