घरट्रेंडिंगबघा Video: हत्तीने पायाने आणि सोंडेने केला महिलेचा मसाज

बघा Video: हत्तीने पायाने आणि सोंडेने केला महिलेचा मसाज

Subscribe

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ होतोय चांगलाच व्हायरल

आपल्या सगळ्यांनाच गणपती बाप्पाचं रूप असलेला हत्ती हा प्राणी आवडतो. मात्र हा भलामोठा हत्ती ज्यावेळी आपल्या समोर येऊन उभा राहिला तर…आपली घाबरगुंडी उडेल हे नक्की…सोशल मीडियावर नेहमीच काहीन काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओमुळे लोकांच्या ज्ञातात भर पडते तर काही व्हिडिओ नेटकऱ्यांचे भरपूर मनोरंजन करणारे असतात. आतापर्यंत तुम्ही पाळीव प्राण्यांची मस्ती आणि त्यांची धम्माल करणारे व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही देखील हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये एक हत्ती आपल्या सोंडेने आणि पायाने महिलेचा मसाज करताना दिसतो.

बघा व्हायरल होणारा व्हिडिओ

- Advertisement -

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून @amir2371360 या नावाच्या युजर्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मोठाला हत्ती एका महिलेची त्याच्या वजनदार पायाने आणि सोंडेने मसाज करतो. सोंडेने मसाज केल्यानंतर काही वेळाने हा हत्ती पायाने महिलेच्या पाठीशी मसाज करतो. व्हिडिओ बघून असं दिसतंय की दोघंही खूप एन्जॉय करत आहे. ती महिला या भल्यामोठ्या हत्तीला न घाबरता धम्माल करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडिओला नेटकरी पंसती देत असून पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघताना दिसताय. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचेही नेटकरी कौतुक करताना दिसताय. या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली असून २०५ युजर्सनी रिट्विट केले आहे. तर या व्हिडिओला लाईकही नेटकरी करताना दिसताय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -