घरट्रेंडिंगफेसबुककडून युजर्सचा विश्वासघात! पुन्हा केला डेटा लिक

फेसबुककडून युजर्सचा विश्वासघात! पुन्हा केला डेटा लिक

Subscribe

फेसबुक हे माध्यम जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र, असे असले तरी फेसबुक याआधी अनेकदा डेटा लीकच्या प्रकरणावरुन वादात सापडले आहे. त्यामुळे सतत फेसबुकवर ऑनलाईन असणाऱ्या युजर्सनी त्याला प्रसंगी विरोधही दर्शविला. फेसबुकवर पुन्हा एकदा डेटा लिक प्रकरणावरुन जोरदार टीका होत आहे. वाचा सविस्तर प्रकरण..

कोणाला विकला डेटा?

समोर आलेल्या माहितीनुसार फेसबुकने त्याच्या लाखो युजर्सचा खासगी डेटा स्मार्टफोनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना विकला आहे. एक-दोन नाही तर तब्बल ६० कंपन्यांना फेसबुकने हा डेटा विकला आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, फेसबुकने ६० नामांकित ‘स्मार्ट फोन मेकर्स’ना हा डेटा विकल्याचे समजते आहे. यामध्ये अॅपल, अॅमेझॉन, ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग अशा इतर ६० कंपन्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

‘या’ कारणासाठी विकला डेटा

फेसबुक गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्टफोन्स् तसेच अॅपल डिव्हाईसेसवर मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. त्यामुळे आपले युजर्स अनेक पटींनी वाढवण्यासाठी फेसबुकने या मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांशी एक करार केला होता. या करारानुसार जेव्हा तुम्ही एखादा स्मार्ट फोन घेता तेव्हा त्यात आधीच फेसबुक अॅप असते. या माध्यमातून फेसबुक आपले युजर्स अधिकाधिक वाढवत जाईल आणि त्यानुसार मोबाईल कंपन्यांना सोशल नेटवर्कचे मेसेजिंग, लाईक बटण तसंच अॅड्रेस बुक इत्यादी फिचर्सची माहिती दिली जाईल. मात्र काही काळानंतर या करारामुळे मोबाईल निर्मात्या कंपन्यांना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता वाटू लागली.

‘युजर्स’च्या मित्रांचीही प्रायव्हसी धोक्यात

फेसबुकने कोणतीही पूर्व कल्पना न देता युजर्ससोबतच त्यांच्या मित्रांचाही खासगी डेटा या फोन कंपन्यांशी शेअर केला. मिळालेल्या महितीनुसार, फेसबुकने नॉन युजर्सचा डेटा शेअर करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी त्यांचा शब्द पाळला नसल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यापर्यंत हे शेअरिंग सुरु होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -