घरCORONA UPDATEFact Check: कोरोना लस घेतल्यानंतर हातातून वीज निर्माण होते?

Fact Check: कोरोना लस घेतल्यानंतर हातातून वीज निर्माण होते?

Subscribe

केवळ लस घेतलेल्या भागात बल्ब ठेवल्यास लाईट पेटते. लस घेतल्यावर हातातून विज पेटत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोरोना महामारीच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहे. कोरोनाविषयी खोटी माहिती, सल्ले सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे कोरोनाविषयी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम राबण्यात येत आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना त्याचे साइड इफेक्ट दिसले आहेत. त्यामुळे लसी घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. केंद्र सरकारने ही अनेकदा लसीकरणासंदर्भात पसरणाऱ्या अफवा रोखण्याचे आवाहन केले. मात्र तरीही सोशल मीडियावर लसीविषयी अफवा, चुकीची माहिती देण्याचे काम सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात कोरोना लस घेतल्यानंतर हातातून विज निर्माण होते असा दावा करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यात किती तथ्य आहे आणि नाही याविषयी PIB (Press Information Bureau) ने खुलासा केला आहे. (Fact Check: Corona vaccine generates electricity from hands?)


या व्हिडिओमध्ये एक माणूस लस घेतलेल्या हातावर लाईट बल्ब पेटवून दाखवताना दिसत आहे. शरीराच्या कोणत्याही भागात बल्ब ठेवल्यास लाईट पेटत नाही. केवळ लस घेतलेल्या भागात बल्ब ठेवल्यास लाईट पेटते. लस घेतल्यावर हातातून विज पेटत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Corona vaccine generates electricity from hands?)  हा दावा संपूर्णपणे खोटा असल्याचा खुलासा PIBद्वारे करण्यात आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर हातातून कोणत्याही प्रकारची वीज निर्माण होत नाही. कोरोना लस अगदी सुरक्षित आहे. अशाप्रकारच्या कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना लसीमध्ये कोणत्याही प्रकारचा धातु किंवा मायक्रोचीप नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर माणसाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा चुंबकीय प्रभाव किंवा विज निर्माण होत नाही. हा व्हिडिओ खोटा असल्याचे स्पष्टीकरण PIBद्वारे देण्यात आले आहे.


हेही वाचा – ॲलोपॅथीच्या १ हजार डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करणार, रामदेव बाबांचा इशारा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -