Fact Check: काय सांगता! नीता अंबानीला पंतप्रधानांनी केला वाकून नमस्कार

सध्या हा फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

Fact Check: Prime Minister Narendra modi bowed to Nita Ambani,photo viral on social media
Fack Check: काय सांगता! नीता अंबानीला पंतप्रधानांनी केला वाकून नमस्कार

पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra modi)  यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रिलायन्स इंडस्ट्रिच्या चेअरमन आणि मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांना हात जोडून वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. वास्तविक पाहता पंतप्रधान मोदी नमस्कार करत असेलेल्या नीत अंबानी नसून दिव्या ज्योती सांस्कृतिक संघटना आणि समाज कल्याण संस्था नावाच्या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित दीपिका मंडल नावाच्या महिलेचा आहे. पंतप्रधान मोदी त्यांना अभिवादन करत आहेत. हा फोटो साल २००५मधील आहे. (Fact Check: Prime Minister Narendra modi bowed to Nita Ambani,photo viral on social media)

पंतप्रधान मोदी अभिवादन करत असलेल्या या फोटोची छेडछाड करुन हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. दीपिका मंडल यांच्या चेहऱ्याच्या जागी नीता अंबानी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दीपिका मंडल यांच्या पतीने देखील ही माहिला माझी पत्नी असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींच्या या फोटोमागील सत्य समोर आल्यानंतर यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे ट्विट मॅनिपुलेडेट मीडिया म्हणून संबोधले जाणार का? असा प्रश्न अंकुर सिंग नावाच्या एका ट्विटर युझरने विचारला आहे. या फॅक्ट चेक नंतर अनेकांनी पंतप्रधानांचा खरा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.


अशाप्रकारचा खोटा फोटो सोशल मीडियावर शेअर करणे चुकीचे आहे. एखाद्याला नापसंत करण्यासाठी अशाप्रकारचे फोटो व्हायरल करणे निंदनीय आहे,आम्हाला त्याची लाज वाटते,असे माजी आयएएस आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जवाहर सरकार यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसंबंधी अशाप्रकारे फेरबदल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दीपिका मंडल यांच्या जागी गौतम अदानी यांच्या पत्नी प्रीति अदानी यांचा चेहरा लावला होता. पंतप्रधान मोदींचा अपमान करण्यासाठी मुद्दाम असे करण्यात येत आहे.


हेही वाचा – बापरे! एका वर्षात २० बाळांची आई बनली २३ वर्षाची तरूणी, वाचा सविस्तर