घरट्रेंडिंगशिर्डीचे साईबाबा बनले चक्क 'मतदार'!

शिर्डीचे साईबाबा बनले चक्क ‘मतदार’!

Subscribe

शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या यादीत 'साईराम' नावाने खोटा अर्ज देणाऱ्याने, अर्जासोबत साईबाबांचा फोटो देखील जोडला होता.

शिर्डी विधानसभा निवडणूकांच्या संदर्भात एक धक्कादायक आणि काहीसा विचीत्र प्रकार समोर आला आहे. विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये एक अज्ञात व्यक्तीने चक्क साईबाबांच्याच नावाने नोंदणी केल्याची बाब उघड झाली आहे. त्या अज्ञात व्यक्तीने ‘साईराम’ नावाने ऑनलाईन अर्ज केला होता. इतकंच नाही तर त्याने या अर्जासोबत जोडलेला फोटो देखील साईबाबांचा होता. निवडणूक अर्जांची पडताळणी करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर लगेचच या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश, माहिती तंत्रज्ञान आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. या प्रकरणामुळे आजवर काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले शिर्डी संस्थान, पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

हेही वाचा : शिर्डी संस्थानात लाखोंचा घोटाळा

 

- Advertisement -
sai baba shirdi
साईबाबांच्या नावाने केलेला खोटा अर्ज

१ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत मतदार याद्यांचे सखोल परिक्षण आणि पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. या आदेशानुसार मतदार याद्या तपासण्याचे आणि त्या अद्दयावत करण्याचे काम सुरु होते. ऑनलाईन माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार १९२ अर्जांची नोंदणी झाली होती. या अर्जांचे पुनर्निरीक्षण करतेवेळी अधिकाऱ्यांना ‘साईराम’ नावाचा एक अर्ज मिळाला. ४ डिसेंबर २०१७ ला हा अर्ज करण्यात आला असून, अर्जासोबत अर्ज करत्याचा फोटो म्हणून चक्क साईबाबांचा फोटो जोडण्यात आला होता. नागरिकांच्या सोयीसाठी सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा गैरफायदा घेत, एका अज्ञात व्यक्तीने ही खोडसाळ हरकत केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान ही विचीत्र हरकत करणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीविरोधात राहता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. श्रीरामपूरचे निवडणूक नायब तहसीलदार सचिन म्हस्के यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे.

दरम्यान याप्रकरणी उपजिल्हा निवडणूक अधिकारी- अरुण आनंदकर म्हणतात, की ‘अशाप्रकारे आयटी कायदा २००० अंतर्गतच्या निवडणूक आणि मतदार यादीत फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. दरम्यान ही खोडसाळ हरकत करणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांना कठोर शासन केले जाईल’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -