घरट्रेंडिंग#fallingstarschallenge : का हे लोक जमिनीवर पडून फोटो काढतायत?

#fallingstarschallenge : का हे लोक जमिनीवर पडून फोटो काढतायत?

Subscribe

Kiki Challenge नंतर आता एक नवीन चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही लोक जमिनीवर अस्ताव्यस्त पडून फोटो काढून ते फोटो इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर अपलोड करत आहेत. वाचा काय आहे हे नवीन चॅलेंज

Kiki Challenge ने काही दिवसांपूर्वी जगभरातील लोकांना वेड लावले होते. आता एक नवीन चॅलेंज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही लोक जमिनीवर अस्ताव्यस्त पडून फोटो काढून ते फोटो इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकवर अपलोड करत आहेत. हे फोटो पाहून लोकांना या चॅलेंजबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील हे एक नवे चॅलेंज आहे. या चॅलेंजचे नाव आहे #fallingstarschallenge, fallingstar2018 किंवा #FallingStarsChallenge. या चॅलेंजमध्ये नेटीजन्स जमिनीवर पालथे पडत आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व महागड्या वस्तू, तसेच कॉस्मॅटिक्स, खेळणी, किचनमधील साहित्य आणि भाज्या अस्ताव्यस्त पडलेल्या या फोटोंमध्ये पहायला मिळत आहेत.

- Advertisement -

श्रीमंतामध्ये मोठी क्रेज

या अजब-गजब चॅलेंजची श्रीमंतांमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. कारण या फोटोंमध्ये महागड्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. तसेच अनेक फोटो हे अत्यंत महागड्या गाड्यांमधून बाहेर पडताना काढलेले आहेत. त्यामुळे फोटो काढणाऱ्यांना त्यांची महागडी गाडी या फोटोंमध्ये प्राधान्याने दाखवायची आहे. काही जणांनी तर त्यांच्या खासगी जेटमधून बाहेर पडून फोटो काढले आहेत. त्यामुळे श्रीमंतांनी त्यांची श्रीमंती दाखवण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.

 

View this post on Instagram

 

Cùng xem bộ lookbook mới của @cobleclothing với concept #fallingstars2018 nhé ?

A post shared by ṅɢѧẇєṅԀʏ (@ngawendyyy) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

Ketika emak-emak pulang pasar ikutan #fallingstarschallenge #fallingstars2018

A post shared by Tania Putri (@taniaputri1707) on

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -