बाबो! पाच मुली आणि एक मुलगा असूनही शेतकऱ्यांने कुत्र्याच्या नावावर केली संपत्ती

एका शेतकऱ्यांनी सहा मुलं असूनही आपली संपत्ती कुत्र्याच्या नावे केल्याची घटना समोर आली आहे.

farmer madhya pradesh declares dog legal heir will along wife
बाबो! पाच मुली आणि एक मुलगा असूनही शेतकऱ्यांने कुत्र्याच्या नावावर केली संपत्ती

बऱ्याचदा आई-वडील आपली संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करतात. मात्र, चक्क सहा मुलं असूनही एका शेतकऱ्यांनी आपली संपत्ती कुत्र्याच्या नावे केल्याची घटना समोर आली आहे. हे कोणतेही चित्रपटाचे कथानक नसून ही एक सत्य घटना आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका शेतकऱ्यांनी चक्क आपली संपत्ती जॅक नावाच्या कुत्र्याच्या नावावर केली आहे.

मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यातल्या एका गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्यांनी त्याची संपत्ती इमानदार कुत्र्याच्या नावावर केली आहे. या कुत्र्याचे नाव जॅकी असून मुलाची वर्तवणूक चांगली नसल्याने ओम नारायण वर्मा यांनी त्यांची अर्धी संपत्ती कुत्र्याच्या नावावर केली आहे. जॅकी ओम नारायण यांची काळजी घेतो. तो सदैव त्यांच्यासोबत असते. त्यामुळे वर्मा यांनी जॅकीला संपत्तीत निम्मा वाटा दिला आहे. जॅकीचा सांभाळ करणाऱ्याला त्याच्या नावे असलेली संपत्ती मिळेल, असे वर्मांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले आहे.

कोण आहेत हे शेतकरी?

छिंदवाड्याच्या बारी बडा गावात राहणाऱ्या ५० वर्षीय ओम वर्मा यांनी दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत. ओम वर्मा यांनी त्यांच्या संपत्तीचा निम्मा हिस्सा त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर केला आहे. तर उर्वरित निम्मा हिस्सा कुत्रा जॅकीच्या नावे केला आहे.

कुत्र्याच्या नावे का केली संपत्ती?

माझी दुसरी पत्नी चंपा वर्मा आणि कुत्रा जॅकी माझा सांभाळ करतात, असे वर्मा यांनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. तसेच चंपा आणि जॅकीवर माझे खूप प्रेम आहे. त्यामुळे मी माझ्या संपत्तीत दोघांना अर्धा-अर्धा वाटा देत आहे. त्याचप्रमाणे पुढे जी व्यक्ती जॅकीची काळजी घेईल, त्यालाच त्याच्या मालकीची संपत्ती मिळेल’.


हेही वाचा – ‘तिच्या घरी ११नंतर राहिलो तर?’ तरुणाच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर