घरट्रेंडिंग'त्या' एका अपघातामुळे जगभर साजरा केला जातो फादर्स डे, या वर्षीची तारीखही...

‘त्या’ एका अपघातामुळे जगभर साजरा केला जातो फादर्स डे, या वर्षीची तारीखही जाणून घ्या

Subscribe

पूर्वी केवळ विदेशातच हा दिवस साजरा केला जायचा. पण आता भारतातही हा दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला जायचा.

प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father’s Day) साजरा केला जातो. यावर्षी १९ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. वडिलांसाठी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. पूर्वी केवळ विदेशातच हा दिवस साजरा केला जायचा. पण आता भारतातही हा दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला जायचा. (Father’s Day is celebrated all over the world because of that one accident. Find out the date of this year father’s day)

वेगवेगळ्या देशात वेगवेगळी तारीख

- Advertisement -

जगभर फादर्स डे (International Father’s Day) वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ८ ऑगस्टला हा दिवस साजरा करतात. तर, थायलंडमध्ये ५ डिसेंबरला साजरा केला जातो.

फादर्स डे चा इतिहास

- Advertisement -

६ डिसेंबर १९०७ मध्ये पश्चिम वर्जिनियामध्ये मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये तब्बल २१० लोकांचा मृत्यू झाला होता. मृत झालेल्या लोकांमध्ये सगळ्यांना मुलं होती. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ लग्रेस गोल्डन क्लेटन यांनी १९ मे १९१० मध्ये फादर्स डेचं आयोजन केलं. यावेळेस जगातील सर्वांत पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला.

फादर्स डे बाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते. ही कथा अमेरिकेचे नेते विलिअम जॅक्सन स्मार्ट यांच्याशी निगडीत आहे. सहाव्या मुलाच्या जन्माच्यावेळी विलिअम जॅक्सन स्मार्टच्या बायकोचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या सहाही मुलांचं व्यवस्थित संगोपन केलं. त्यामुळे त्यांची मुलगी सोनोरा हिला आपल्या वडिलांप्रती काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली.

१९०९ मध्ये स्पोकानेच्या सेंट्रल मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप यांच्याकडून मदर्स डे बाबत उपदेश सुरू होता. हे ऐकताना सोनोराला वाटलं की मातृदिन प्रमाणेच पितृदिनही साजरा केला पाहिजे. त्यामुळे तिने आपल्या वडिलांच्या जन्मदिनापासून म्हणजेच ५ जून रोजी फादर्स डे साजरा करण्याचे ठरवले. तिच्या या निर्णयाला स्पोकेन मिनिस्टीरियल एलायंसनेही मान्यता दिला. तेव्हापासून जगभर फादर्स डे साजरा केला जातो असं सांगण्यात येतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -