जेली, टूटी फ्रूडी अन् ड्राय फ्रूट्स भरलेला Candy Crush पराठा पाहून नेटकरी म्हणाले…

विचित्र कॉम्बिनेशन असलेला हा कँडी क्रश पराठा सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय. मात्र हा पराठा पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी खिल्ली देखील उडवली आहे.

food blogger test Candy Crush Paratha video viral on social media
अरे देवा! जेली, टूटी फ्रूडी अन् ड्राय फ्रूट्स भरलेला Candy Crush पराठा पाहून नेटकरी म्हणले 'हे नको'

मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कँडी क्रश या प्रसिद्ध मोबाईल गेमची निर्मिती करणारी कंपनी विकत घेतली आहे. (microsoft buys candy crush)  गेमिंग (Gaming)  क्षेत्रातील ही सर्वात मोठी डील आहे. कँडी क्रश हा गेम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता गेम आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा गेम खेळला असेल. मोबाईल अँप तसेच फेसबुकवर देखील हा गेम खेळला जातो. त्यामुळे हा गेम आता सर्वांनाच माहिती झाला आहे. कँडी क्रश गेम तुम्हाला माहिती असेल पण तुम्हाला कँडी क्रश पराठा (Candy Crush Paratha ) माहितीय का? कँडी क्रश पराठा ऐकूनच हा काय प्रकार असा प्रश्न पडला असेल. तर कँडी क्रश पराठा बनवणाऱ्या एका दुकानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

विचित्र कॉम्बिनेशन असलेला हा कँडी क्रश पराठा सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय. मात्र हा पराठा पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी खिल्ली देखील उडवली आहे. कसा आहे हा पराठा आणि कुठे मिळतो जाणून घ्या.

दिल्लीच्या पराठा गल्लीमध्ये एका दुकानात कँडी क्रश पराठा बनवला जातो. मिर्ची पराठा, पापड पराठा, भेंडी पराठा, मावा पराठा यासारखे अनेक पराठे या पाराठा गल्लीत खायला मिलतात. मात्र सध्या कँडी क्रश पराठा प्रचंड फेमस आहे. दिल्लीच्या चांदनी चौकमधील एक दुकान कँडी क्रश पराठ्यासाठी फेमस आहे. या पराठ्यात कँडी क्रश गेमसारख्या रंगीबेरंगी कँडी फ्लेवर्सचे स्टफिंग भरलेले असते. ज्यात जेली, टूटी फ्रूडी अन् ड्राय फ्रूट्स असतात हा पराठा बटाट्याची भाजी, लोणचे आणि चटणी अशा विचित्र प्लेटिंगमध्ये सर्व्ह केले जाते.  पराठा दिसायला तर चांगला आहे. मात्र खाल्ल्यानंतर आपल्या पोटाची काळजी घेणे आपल्याच हातात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chahat Anand (@chahat_anand)

दिल्लीतील एका फूड व्लॉगरने कँडी क्रश पराठ्याचा व्हिडीओ बनवला आहे हा व्हिडीओ Chahat_anand या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्लॉगर मुलगी पराठा खाऊन म्हणाली, ‘कँडी क्रश पराठ्याची आयडीया चांगली आहे. लहान मुले हा पराठा खाऊ शकतात. कारण हा पराठा फार गोड आहे. एक दोन बाइटनंतर मला पराठा खाऊ वाटला नाही’.

व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी व्हिडीओवर दणकून कमेंटचा वर्षाव केला आहे. ‘असा पराठा खाऊन मंगळावर जावं लागेल’, ‘असे विचित्र पदार्थ खाऊन पोटाची वाट कोण लावून घेऊ’, अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युझरने म्हटले आहे की, ‘कँडी क्रश पराठ्यापेक्षा आमचा कँडी क्रश गेम बरा’.


हेही वाचा  – लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये बोलण्याची संधी न दिल्याने महिलेने वेडे वाकडे इशारे करत सुरू केला नाच, पाहा Viral Video