फोर्ब्सच्या यादीत टॉप ५ मध्ये दीपिका सामील

फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत पहिल्यांदा अभिनेत्री दीपिका पदुकोण टॉप ५ मध्ये सामील झाली आहे. नुकतेच फोर्ब्सने यंदाची यादी जाहीर केली आहे.

deepika padukon
दीपिका पदुकोण (सौजन्य-फायनान्शियल एक्सप्रेस)

फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत पहिल्यांदा अभिनेत्री दीपिका पदुकोण टॉप ५ मध्ये सामील झाली आहे. नुकतेच फोर्ब्सने यंदाची यादी जाहीर केली आहे, त्यानुसार बॉलीवूडचा दबंग सलमान खान पहिल्या तर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अक्षय कुमार तिसऱ्या आणि भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. शिवाय प्रथमच या यादीतील टॉप ५ मध्ये समावेश झालेली दीपिका पदुकोण चौथ्या क्रमांकावर आहे. या निमित्ताने श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत टॉप ५ मध्ये येणारी दीपिका ही पहिली महिला आहे.

शाहरुख झाला यादीतून आऊट 

भारतातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये किंग शाहरुख खान टॉप १० मधून बाहेर पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. सलमानने २०१८ या वर्षात तब्बल २५३ कोटी रुपयांची कमाई केली असून यंदाच्या वर्षात सलमानने टायगर जिंदा है आणि रेस ३ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून कमाई केली. सोबतच त्याचे टीव्हीवर त्याचे रिअॅलिटी शोज सुरु असून विविध ब्रॅन्ड्सचा तो ब्रॅन्ड अॅम्बेसिडरदेखील आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीची कमाई २२८ कोटी रुपयांची आहे. अक्षय कुमारची वर्षभरात १८५ कोटी रुपयांची कमाई केली आहेत.