घरटेक-वेकनव्या वर्षात स्वस्त झाले हे सामान

नव्या वर्षात स्वस्त झाले हे सामान

Subscribe

नव्या वर्षात अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्याचे कारण जीएसटी असल्याचे सांगितले जाते. केंद्र सरकारने अनेक वस्तुंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के केल्यामुळे या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेऊ या!

एलईडी टीव्ही
शामोमीने एमआय एईडी स्मार्ट टीव्ही ४ ए ३२ आणि एमआई एलईडी टीव्ही ४ सी प्रो ३२ च्या किमतीत २००० रुपयांनी कपात केली आहे. कंपनीने एमआयई एलईडी टीव्ही ४ सी प्रो ३२ टीव्हीची किमतही कमी केली आहे. याशिवाय अन्य कंपन्यांचे एलईडी टीव्हीही स्वस्त झाले आहेत.

- Advertisement -

एलपीजी सिलिंडर
अनुदानित एलपीजी सिलिंडर ५.९१ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर १२०.५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

पॉवर बँक
नव्या वर्षात पॉवर बँकच्या किमतीही घटल्या आहेत. सरकारने यावर लावण्यात आलेल्या जीएसटी दरात कपात केल्यामुळे त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत.

- Advertisement -

टायर
सरकारने मागील महिन्यात जीएसटी समितीच्या बैठकीदरम्यान टायरवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून कमी करून १८टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता वाहनांचे टायर स्वस्त झाले आहेत.

व्हिडिओ गेम
व्हिडिओ गेम कंसोल आणि एचएस कोड ९५०४ अंतर्गत येणार्‍या गेमशी संबंधित वस्तुंवरील जीएसटी कमी झाल्यामुळे व्हिडिओ गेमच्या किमती घटल्या आहेत.

डिजिटल कॅमेरा
जीएसटी कमी झाल्यामुळे नव्या वर्षात डिजिटल कॅमेर्‍याच्या किमती कमी झाल्या आहेत. बहुतेक सर्वच कंपन्यांनी आपल्या कॅमेर्‍याच्या किमती कमी केल्या आहेत.

फ्रोजन भाज्या
फ्रोजन भाज्या ब्रॅण्डेड आणि डबाबंद भाज्या नव्या वर्षात स्वस्त झाल्या आहेत.
थर्ड पार्टी इन्शुरन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -