Friendship Day 2021: ‘या’मुळे साजरा केला जातो ‘फ्रेंडशिप डे’

मैत्रीचा दिवस म्हणजे 'फ्रेंडशिप डे'. यादिवशी बरेच मित्र एकमेकांना भेटतात आणि 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छांसह भेटवस्तू देत 'फ्रेंडशिप डे' साजरा करतात. परंतु, 'फ्रेंडशिप डे' साजरा का केला जातो. यामगचे कारण कोणाला माहित आहे का? जाणून घ्या. का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे'.

‘फ्रेंडशिप डे’ म्हटलं का मज्जा, मस्ती, खाणं, पिणं हे आलेच. पण, आपण साजरा करत असलेला ‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे काय तर, बऱ्याच जणांना माहित आहे, ते म्हणजे मैत्रिचा दिवस. अहो. पण, जो तुम्ही ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा करता त्या मागचे काही कारण देखील तसेच आहे. ते नेमके काय आहे, हे मी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. पण, हा ‘फ्रेंडशिप डे’ कोणत्याही तारखेनुसार नाही तर दिवसानुसार साजरा केला जातो. तो दिवस म्हणजे ‘ऑगस्ट’ महिन्यातील पहिला ‘रविवार’. हो. दरवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील पहिल्या ‘रविवारी’ जी तारीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून ओळखला जातो.

Friendship-Day
 

…म्हणून साजरा केला जातो ‘फ्रेंडशिप डे’

पण, आपल्याकडे अलिकडे ‘फ्रेंडशिप डे’चे वारे वाहू लागले आहेत. पण, याची सुरुवात फार जुनी आहे. त्याचे कारणही तसेच आहे. १९३५ मध्ये अमेरिकेत एक घटना घडली. ही घटना म्हणजे या दिवशी एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी जीव दिला होता. म्हणून त्यांची आठवण म्हणून ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा दिवस ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा करण्यात येतो.

असं म्हटलं जातं की, ‘१९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने एका निर्दोष व्यक्तीची हत्या केली होती. त्यानंतर दु:खी झालेल्या त्याच्या मित्राने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर दक्षिण अमेरिकेतील लोकांनी त्या निर्दोष मित्रांच्या मृत्यूवर राग व्यक्त केला आणि त्यानंतर अमेरिकेच्या सरकारला लोकांनी धारेवर धरले आणि तो दिवस मैत्रिचा दिवस म्हणून घोषित करण्यासाठी तगादा लावला. अखेर सरकारने त्यांचे म्हणणे मान्यही केले. पण, त्यासाठी तब्बल २१ वर्ष लागली. दरम्यान, १९५८ मध्ये अमेरिका सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आणि संपूर्ण जग ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा करु लागले. पण, भारतात ‘फ्रेंडशिप डे’ चे महत्त्व असेच आहे असं नाही. कारण भारतात मैत्रीची अनेक उदाहरण आहेत. महाभारत आणि रामायणात असलेली मैत्री भारतीय लोकांना आजही आकर्षित वाटते. त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या उद्देशाने ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात. विशेष म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’ हा रविवारी येतो. त्यामुळे हा दिवस अधिकच द्विगुणित होतो. कारण रविवार असल्याने अनेक मित्र एकमेकांना भेटतात. फिरायला जातात आणि ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करतात. तुम्हीही यंदाचा फ्रेंडशिप डे साजरा करा पण, ऑनलाईन. आणि हो तुम्हालाही ‘फ्रेंडशिप डे’च्या My Mahanagar कडून मन: पूर्वक शुभेच्छा.


हेही वाचा – ‘फ्रेंडशिप डे’ निमित्ताने मित्रांसोबत ऐका ‘ही’ १० गाणी