Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग डोळ्यात टॅटू, दातात मेटल, जीभही भन्नाट, जगातल्या पहिल्या बॉडीबिल्डरचा मॉडिफाई अवतार

डोळ्यात टॅटू, दातात मेटल, जीभही भन्नाट, जगातल्या पहिल्या बॉडीबिल्डरचा मॉडिफाई अवतार

Related Story

- Advertisement -

अविश्वसनीय आणि कल्पनेच्या पलीकडे जे काही केले जाते त्याने आश्चर्यचकित घडते. दिल्लीतही असाचा काहीसा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील एका तरूणानेही असेच काही केले ज्यामुळे तो चर्चेत आहे. जो जगातील पहिला मॉडिफाई बॉडी बिल्डर ठरला आहे. त्याच्या शरीरावर असा कोणताही भाग नाही ज्यावर टॅटू केलेला नाही. बरीच वर्षे टॅटू काढल्यानंतर आणि कित्येक शस्त्रक्रियांनंतर मॉडिफाई बॉडीबिल्डर बनल्यानंतर, जग त्याला “टॅटूग्राफर करण” म्हणून ओळखत आहे. टॅटूग्राफर करणच्या शरीरावर असा कोणताही भाग नाही जिथे टॅटू काढलेला नाहीत. शरीराव्यतिरिक्त, त्याच्या डोळ्यामध्ये देखील टॅटू काढले आहेत. टॅटूची हौस पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःच्या कानात बदल केले आहेत. त्याने आपले सर्व दात काढले आणि धातूचे दात बसविले असल्याचे सांगितले जात आहे. त्याची जीभेवरही शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्याची मानवाची जीभ दिसत नसून सापाची जीभ असल्याचे दिसते.

टॅटूग्राफर करणने वयाच्या १६ व्या वर्षी पहिला टॅटू काढला. त्यानंतर त्याने टॅटू आर्टिस्टचे काम सुरू केले आणि स्वतःच्या शरीरावर प्रथम टॅटू काढला. हे वेड वाढत गेल्याने करणने वर्षानुवर्षे संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्याचा ध्यास बाळगला. टॅटू आर्टिस्टसह तो बॉडीबिल्डर देखील असल्याचे सांगितले जात आहे. बॉडीबिल्डिंग आणि टॅटू काढणे दोन्ही खूप अवघड आहेत कारण टॅटू काढताना शरीरातून बरेच रक्त बाहेर येते आणि त्यांना विश्रांती घ्यावी लागते. त्याच बॉडीबिल्डिंगसाठी त्यांना शरीराशी संबंधित कठोर परिश्रमांची आवश्यकता आहे. कदाचित म्हणूनच हे दोन छंद एकत्र करणे म्हणजे एक अशक्य कार्य करणे शक्य करण्यासारखे आहे.

- Advertisement -

करणने असे सांगितले की, टॅटू बनवताना बऱ्याच वेळा तो बेशुद्ध अवस्थेत गेल्याचे त्याने सांगितले. बॉडीब‍िल्ड‍िंग करण्यासाठी आणि आपल्या शरीरावर टॅटू बनवण्यासाठी त्याच्यावर कित्येक वेळा शस्त्रक्रिया केली गेली आणि बर्‍याच शस्त्रक्रियांमध्ये त्याच्या जिवाला धोका देखील झाला होता. असे सांगितले जाते की, करण हा भारतातील पहिला व्यक्ती आहे ज्याने आपल्या डोळ्यांत टॅटू काढला आहे. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे, ज्यासाठी करण न्यूयॉर्कला गेली होता. तिथे ऑस्ट्रेलियन डिझायनरने त्याच्या डोळ्यात टॅटू काढला. करणची ही आवड एखाद्या साधनेपेक्षा कमी नाही. करण याने असेही सांगितले की, बॉडीबिल्डिंग आणि टॅटूची आवड पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक वेळा आपल्या आयुष्यात अनेक जोखीम पत्करली आहे.

आपल्या शरीरावर इतकी जोखीम घेऊन छंद पूर्ण करणे इतके सोपे काम नाही आणि करणचे आई-वडील या कामासाठी नेहमीच त्याच्यासोबत असतात. स्वत: करणच्या वडिलांनाही शरीरावर अनेक भागावर टॅटू काढले आहेत. तो एक छायाचित्रकार आहे. करणला कुटुंबाचा इतका आधार होता की, त्याच्या वडीलांनी असे सांगितले की, जेव्हा करणच्या डोळ्यामध्ये टॅटू बनवले गेले तेव्हा डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची भीती होती. अशा परिस्थितीत त्याचे वडीलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -