घरट्रेंडिंगअशीही व्हायरल ईद...

अशीही व्हायरल ईद…

Subscribe

व्हिडिओमध्ये चक्क ईदच्या शुभेच्छा एका मुलीला देण्यासाठी मुलांनी भली मोठी रांग लावल्याचं दिसत आहे. व्हिडिओ होतोय व्हायरल

ईद म्हणजे मुस्लीम समाजाचा सर्वात मोठा सण. या दिवशी समाजातील प्रत्येक जण एकमेकांची गळाभेट घेऊन लहानांना ईदी देत असतो. पण हीच गळाभेट जर एखाद्या मुलीकडून घेण्यासाठी भलीमोठी रांग लागत असेल तर? थोडं विचारात पडलात ना? पण असाच मुलीची गळाभेट घेण्यासाठी लागलेल्या रांगेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रसिद्धीसाठी नव्या नव्या युक्ती

सध्या लोक प्रसिद्धीसाठी काही करतात असं म्हटलं जातं. पण या व्हिडिओमध्ये चक्क ईदच्या शुभेच्छा एका मुलीला देण्यासाठी मुलांनी भली मोठी रांग लावल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर प्रत्येकाशी गळाभेट झाल्यानंतर नक्की किती माणसांबरोबर ही मुलगी गळाभेट घेत आहे याची मोजणी तिच्यामागील तिची मैत्रीण करताना दिसत आहे. पहिल्यांदा नक्की काय घडत आहे हे कळतच नाही. पण नंतर एक एक करून प्रत्येक मुलगा रांगेत पुढे पुढे येत त्या मुलीची गळाभेट घेत आहे. त्यानंतर हात मिळवून पुढे निघून जात आहे. हा व्हिडिओ संपेपर्यंत साधारण ३० मुलांची गळाभेट या मुलीनं घेतली असल्याचं दिसत आहे. तर मध्येच काही जण तिच्याबरोबर सेल्फी घेत असल्याचंही दिसत आहे. या मुलीची गळाभेट घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी जमल्याचंही या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

कोण आहे ही मुलगी?

नक्की ही मुलगी कोण आहे? तिनं असं करायचा हेतू काय आहे? हे सर्व अजून स्पष्ट झालं नाही. सध्या असे व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ४००२ इतके व्ह्यूज युट्यूबवर मिळाले आहेत. आता हा व्हिडिओ पुढे किती ट्रेंड होतोय ते पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -