Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड तिच्या आईबरोबर पसार

गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड तिच्या आईबरोबर पसार

गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म पण बॉयफ्रेंड तिच्या आईलाच घेवून गेला पळवून

Related Story

- Advertisement -

प्रेमात मिळालेल्या विश्वास घाताने अनेकांना दु:ख अनावर होते. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं, विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात करावा हा धक्का कोणालाही सहन होवू शकत नाही. किंवा हा धोका पजवनं एका व्यक्तीसाठी फार अवघडच असतं. अशीच प्रेम प्रकरणात धोका मिळणारी एक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे.

इंग्लंडमधील jess Aldridge वय वर्ष २४ असलेल्या एका मुलीचे २९ वर्षीय Riyan Shelton सोबत प्रेमसंबंध होते, प्रेमसंबंधातून jess ने एका मुलाला जन्म दिला. मात्र यादरम्यानच रयान जेसच्या आईसोबत संबंधात आला आणि जेसला सोडून तो आईबरोबर फरार झाला. २८ जानेवारीला जेस हॉ़स्पिटलमधून घरी आली, तिने रयानच्या मुलाला जन्म दिला होता. पण घरी येताच तिला समजलं की, रयान आणि जेसची ४४ वर्षी आई Georgina तिथून ४८ किमी दूर असलेल्या एका घरात शिफ्ट झाले आहेत. जेस साठी हा खूप मोठा धोका होता. ती म्हणाली, हा विश्वासघात आहे, एका आजीला तिच्या नातवावर प्रेम करायला हवे ना त्याच्या वडिलांवर.

- Advertisement -

जेसच्या म्हण्यानुसार, तिची आई रयानसोबत फ्लर्ट करत होती. माझा ह्या अशा परिस्थितीत आईला माझ्यासोबत असायला हवं होतं, माझी मदत करायला हवी होती पण, ती माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. जेस ने ह्या आधीही दोघांना याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनीही रिलेशनमध्ये असल्याचा नकार दिला. काही दिवसांपूर्वी जेव्हा जेसने एका मुलाला जन्म दिला. त्यनंतर तिला तिच्या बॉयफ्रेंड रयानचा मेसेज आला आणि रिलेसन संपवण्याची गोष्ट त्याने सांगितली. जेव्हा जेस घरी परत आली तेव्हा तिची आई व बॉयफ्रेंड हे दोघेही घरात दिसले नाही. व ते कुठे दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे तिला समजले. जेसच्या आईचे असे म्हणणे आहे की , आपण कोणावर प्रेम करावं हे आपण ठरवू शकत नाही, रयान आणि मी आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो, इतकंच नाही तर आम्ही दोघांनीही फेसबुकवरुन आपचं हे प्रेम जगजाहीर केले आहे.


 

- Advertisement -