घरट्रेंडिंगगुगलला 'मेन्स डे'चा विसर: गुगलविरोधात मिम्स होतायत व्हायरल

गुगलला ‘मेन्स डे’चा विसर: गुगलविरोधात मिम्स होतायत व्हायरल

Subscribe

गुगल डुडलच्या माध्यमातून गुगल नेहमीच महत्त्वाचे दिवस साजरे करत असतो. आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवसाची मात्र गुगलला विसर पडली आहे.

जगभरात १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा करण्यात येतो. भारतात २००७ पासून पुरूष दिन साजरा करण्याची सुरूवात झाली. महिला दिवस सर्वांना माहिती असतो. मात्र पुरूष दिवस हा फार कमी जणांना माहिती असतो. कोणत्याही महत्त्वाच्या दिवसांची प्रामख्याने आठवण ही गुगलला असते. गुगल डुडलच्या माध्यमातून गुगल नेहमीच महत्त्वाचे दिवस साजरे करत असतो. आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवसाची मात्र गुगलला विसर पडली आहे. पुरूष दिनाच्य दिवशी गुगलने शुभेच्छा देणारे डुडल बनवले नाही. यावरून नेटकऱ्यांनी मात्र गुगलला डुडल न बनवण्याबद्दल प्रश्न विचारले आहे. आज गुगल ओपन केल्या नंतर पुरूष दिनाचे डुडल न दिसल्याने नेटकऱ्यांमध्ये नाराजी पहायला मिळली. नेटकऱ्यांनी  गुगलचे मिम्स व्हायरल करायला सुरूवात केली आहे.

जागतिक पुरूष दिनाचे औचित्य साधून पुरूषांच्या आरोग्याबद्दल, समाजातील सकारात्मक दृष्टिकोनाबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जातो. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक मजेदार मिम्स तयार केले आहेत. गुगल हे महिला आणि पुरूष यांच्यात भेदभाव करते का असा प्रश्न उपस्थित केला आहे. गुगलने पुरूष दिनानिमित्त डुडल न बनवल्याने हिच तुमची समानता आहे का असा प्रश्न केला आहे.

- Advertisement -

ट्विटरवरही युजर्सने पुरूष दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सीमेवरील सैनिकांचे फोटो पोस्ट करून महिलांनीही पुरूष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजात महिलाच नाहीतर पुरूषांवरही अत्याचार होतात. शोषण,असामता हे महिलांप्रमाणे पुरूषांनाही सहन करावी लागतात. पुरूषांचे मानसिक आरोग्य आणि त्यांच्या गुणांचे कौतुक करणे,लैगिंक समानता हा आतंरराष्ट्रिय पुरूष दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -