घरट्रेंडिंगHBD Google: २३ वर्षांचं झालं गूगल, Birthday केक सोबत शेअर केलं खास...

HBD Google: २३ वर्षांचं झालं गूगल, Birthday केक सोबत शेअर केलं खास Doodle

Subscribe

गूगलला आधी 'गूगलल गाइस' या नावाने ओळखले जात होते

लाखो लोकांचे वाढदिवस तसेच त्यांचे महत्त्वाचे दिवस सेलिब्रेट करणाऱ्या गूगलचा (Google) आज वाढदिवस. गूगलल आज त्याचा २३वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील महत्त्वाच्या दिवशी त्या दिवसाचे वर्णन करणारे खास डुडल (Doodle) गूगलकडून तयार केले जाते. आज गूगलने देखील स्वत:च्या वाढदिवसानिमित्त खास डुडल तयार केले आहे. यात गूगलने स्वत:साठी खास केकचे डुडल तयार केला आहे. गूगलची स्थापना १९९८मध्ये stanford universityaमध्ये PHD करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली होती. लॅरी पेज (Larry Page) आणि सर्गेई ब्रिन (Sergei Brin) अशी त्यांची नावे आहेत. गूगलला आधी ‘गूगलल गाइस’ या नावाने ओळखले जात होते.

दररोज प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही गूगलवर काही तरी सर्च करण्यापासूनच होत असते. आज सर्च इंजिन ओपन करताच गूगलचे Happy Birthdayचे Doodle पहायला मिळाले.गूगलने डुडलमध्ये खास केक तयार केलाय ज्यात २३ असे लिहिले आहे. तर गूगलची अक्षरे डोनेटच्या स्वरुपात तयार केली आहेत. L या शब्दाच्या जागी डुडलवरील केकवर मेणबत्ती दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

१५ सप्टेंबर १९९५ला Google.com या डोमेनचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. मात्र गूगलला कंपनीकडून ४ सप्टेंबर १९९८ रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्यानंतर २७ सप्टेंबरला गूगल सर्च इंजिनवर रेकॉर्ड नंबर पेज सर्च करण्यात आले आणि त्यानंतर हा दिवस गूगलचा जन्मदिवस म्हणून ग्राह्य धरण्यात आला.

२३ वर्षात गूगल संपूर्ण जगभरातील सर्वांत मोठे सर्च इंजिन म्हणून काम करत आहे. गूगलवर आज १०० हून अधिक भाषांमध्ये सर्च करता येते. सर्च इंजिन असलेल्या गूगलचा वापर लॅपटॉप,कॉम्पूटर, मोबाईलवर करता येतो. गूगल हे एका क्लिकवर अफाट माहिती देणारे साधन झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shardiya Navratri 2021: जाणून घ्या, कधी असणार शारदीय नवरात्री आणि दसरा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -