तुमच्या गारव्यावरही सरकारचा कंट्रोल, नवे आदेश!

Ac temprature is set to be on 24 to save electricity
आता तुमच्या गारव्यावरही सरकारचा कंट्रोल

ट्रेन, बस असा धकाधकीचा प्रवास करुन घरी येतो. या प्रवासात आपण इतके घामाघूम होतो. घरी आल्यावर लगेच आपण एसीचं बटण दाबतो आणि गार हवेखाली बसत सुस्कारा सोडतो. मग हवा झटपट मिळावी म्हणून आपण लगेचच एसीचे तापमान २०-१९- १८ असं कमी कमी करत जातो. तुम्हीही असं करत असाल तर थांबा! कारण आता एसीचं कूलिंग फक्त २४ डि. से. पुरतंच मर्यादित राहणार आहे. वाचून गोंधळला असाल ना!

काय आहे हा निर्णय?

हल्ली १० पैकी ९ घरात एसी असतोच. त्यामुळे वीजेचा अधिक वापर होतो. गरम झाले की चटकन एसी लावला जातो. ही वीज वाचवण्यासाठीच वीज मंत्रालयाने एसी उत्पादकांना त्यांचे कमीत कमी तापमान २४ डिग्री सेल्सिअस इतके ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे कमीत कमी तापमान हे २४ डिग्री सेल्सिअस असणार आहे. प्रायोगिक तत्वावर एसी उत्पादकांना हा बदल करण्याचे सांगितले असून पुढील काळात वीज हा नियम सगळ्यांनाच लागू होण्याची शक्यता आहे.

२ हजार कोटी युनिट वीज वाचणार

अबब! २ हजार कोटी युनिट वीज वाचणार म्हटल्यावर तुमच्या भुवया उंचावल्या असतील. पण हो वीज मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार या निर्णयानंतर किमान २ हजार कोटी युनिट वीज वाचणार आहे. एसीच्या कमी कुलिंगसाठी जास्त वीज खर्ची पडते. हे निर्वेक्षणाअंती समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कमी तापमान शरीराला घातक

मानवी शरीराचे तापमान ३६ ते ३७ डिग्री सेल्सिअस असते. ऑफिस आणि हॉटेलमध्ये एसीचे तापमान १८ ते २१ इतके कमी असते, जे शरीराला चांगले नाही. शिवाय एसीच्या गारव्याने थंडी लागल्यानंतर आपण लगेचच अंगावर ब्लँकेट घेतो. त्यामुळे त्या एसीचाही काही उपयो नाही. एकूणच आपण वीजेचा अपव्यय कतो असते देखील वीज मंत्रालयाकडून सांगण्यात आले.