घरट्रेंडिंगPromise Day च्या दिवशी जोडीदाराला द्या 'ही' खास वचनं अन् नातं करा...

Promise Day च्या दिवशी जोडीदाराला द्या ‘ही’ खास वचनं अन् नातं करा अधिक घट्ट

Subscribe

तरुणांमध्ये व्हॅलेंटाइन वीक किंवा लव्ह वीकची खूप क्रेझ आहे. आज 11 फेब्रुवारी 2022 हा प्रॉमिस डे 2022 (Promise Day 2022)  म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, जोडप्यांना किंवा तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला काही खास वचने द्या. प्रॉमिस डे २०२२ रोजी एकमेकांना कोणती वचने दिली जाऊ शकतात ते जाणून घ्या.

फेब्रुवारी म्हणजे प्रेमी युगुलांच्या प्रेमाला बहर आणणारा महिना. वर्षभर अनेक जोडपी या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो. आपला व्हॅलेंटाइन डे कायम लक्षात राहण्यासाठी आणि खास करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्लॅनिंग करतात.तरुणांमध्ये व्हॅलेंटाइन वीक किंवा लव्ह वीकची खूप क्रेझ आहे. आज 11 फेब्रुवारी 2022 हा प्रॉमिस डे 2022 (Promise Day 2022)  म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, जोडप्यांना किंवा तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला काही खास वचने द्या. प्रॉमिस डे 2022 ला एकमेकांना कोणती वचने दिली जाऊ शकतात ते जाणून घ्या.

 

- Advertisement -

साथ निभवण्याचे वचन

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता तेव्हा प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणात तुम्ही त्याच्यासोबत असताच. या प्रॉमिस डेच्या दिवशी वचन द्या की, परिस्थिती कशीही असो, तुम्ही दोघेही एकमेकांना नेहमीच साथ द्याल, जरी त्यावेळी तुमच्यासोबत कोणी नसले तरी. कधी कधी एकमेकांचा हात हातात घेतल्यानेही अनेक समस्या सुटतात.

 

- Advertisement -

उत्तम आरोग्याचे वचन

या प्रॉमिस डे वर, तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या आरोग्याचे वचन देऊ शकता. या वचनाचा अर्थ असा आहे की आतापासून तुम्ही दोघेही एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची पूर्ण काळजी घ्याल. अनेक वेळा लोक आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर होतात. त्यामुळे एकमेकांना वचन द्या की तुम्ही स्वतःसह एकमेकांच्या फिटनेसची आणि भावनांची पूर्ण काळजी घ्याल.

एकमेकांसोबत फिरण्याचे वचन

तुम्ही दोघंही एकमेकांसोबत खूप वेळ घालवता हे मान्य, पण कधी कधी बाहेर फिरायला जाणं खूप गरजेचं असतं. यामुळे तुम्ही घर-ऑफिसच्या तणावापासून दूर व्हाल आणि एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. जर तुम्ही कोविड काळात बाहेर जाण्याबद्दल घाबरत असाल, तर तुमच्या शहरातच काही दिवस ट्रॅव्हल प्रॉमिसेस घ्या. थोडासा बदलही नात्यात ताजेपणा आणतो.

सोशल मीडियापासून एकमेकांना वेळ देण्याचे वचन

कधी कधी जोडपी एकमेकांच्या जवळ राहूनही एकत्र नसतात. दिवसभराचा थकवा आणि अंतरानंतर दोघेही आपापल्या फोन, लॅपटॉप किंवा सोशल साइट्सवर व्यस्त होतात. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. दररोज थोडा वेळ फक्त एकमेकांसाठी ठेवा. त्यावेळी फक्त स्वतःबद्दल बोला.

प्रेम आणि एकमेकांच्या आदराचे वचन

प्रत्येक जोडप्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही समस्या इतकी मोठी नसते की ती तुमच्या दोघांच्या नात्यावर परिणाम करु शकेल. तुमच्या हृदयातील एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर कमी होऊ देऊ नका. जर कधी एखाद्या गोष्टीवरून भांडण झाले तर ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा.


हे ही वाचा – काय मग, तुम्हालाही यंदा Valentine’s Day ला पार्टनरला खुश करायचंय ? फॉलो करा ‘या’ Ideas


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -