Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कुत्र्यावरून दोन गटात राडा, ९ जण जखमी

कुत्र्यावरून दोन गटात राडा, ९ जण जखमी

Related Story

- Advertisement -

हरियाणा राज्यात कुत्र्यावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. कुत्र्याने दारात घाण केल्याने ही जोरदार हाणामारी झाली.हरियाणातील पानीपत जिल्ह्यात दयाराम हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. यांच्या घरासमोर एक कुत्रा रोज घाण करत होता. त्यावेळी दयाराम यांच्या आईने रागात त्या कुत्र्याला झाडूने मारुन हकवून दिले. यावेळी २० ते २५ जणांच्या घोळका दयाराम यांच्या घरासमोर जमा झाला. याच घोळक्याने दयाराम यांच्या कुटुंबियांना लाठ्या काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत तब्बल ९ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यात एकाच्या बोडाला गंभीर इजा झाली असून बोट तुटले आहे. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीत महिलांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेदरम्यान हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचाही वापर केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात दोन्ही गटातील लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.


हेही वाचा- बाबो! व्हिस्कीची एक बॉटल विकली गेली तब्बल १० लाख डॉलर्सला

- Advertisement -

 

- Advertisement -