Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग भारतीय महिलांची 'या' गोष्टीवर होतेय जरा जास्तच 'टिवटिव'

भारतीय महिलांची ‘या’ गोष्टीवर होतेय जरा जास्तच ‘टिवटिव’

Related Story

- Advertisement -

गेल्या काही काळापासून ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात तब्बल 1.75 कोटी लोकं ट्विटरचा वापर करतात. या ट्विटर वापरकर्त्यांमध्ये महिला देखील आघाडीवर आहे. या महिला वापरकर्त्या ट्विटरवर नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करतात. याबाबत ट्विटर इंडियाने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत भारतातील १९ शहरांमधील ७ हजार ८३९ महिलांच्या ट्विटर अकाउंटचा अभ्यास करण्यात आला. यात ५ लाख २२ हजार ९९२ ट्विटचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात महिला फॅशन, पुस्तके, सौंदर्य, मनोरंजन आणि फूट विषयी सर्वाधिक चर्चा करत असल्याचे जाहीर झाले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ट्विटर इंडियाने हे सर्वेक्षण जाहीर केले. यामध्ये भारतीय महिला ट्विटरवर ट्रेंडिंग टॉपिक आपल्या आवडीनिवडी, पॅशनबाबत सर्वाधिक चर्चा केली. तब्बल २४.९९ टक्के भारतीय महिलांनी ट्विटरवर आपल्या पॅशन, आवडीनिवडीवर चर्चा केली. या पॅशन, आवडीनिवडीमध्ये महिलांनी पुस्तके, फॅशन, सौंदर्य, मनोरंजन आणि फूड यांचा समावेश आहे. तर २०. ८ टक्के महिलांनी चालू घडामोडींवर ट्विट केले. १४. ५ टक्के महिलांनी सेलिब्रिटींविषयी चर्चा, ट्विट करण्यास पसंती दिली. तर ११. ७ टक्के महिलांनी समाज आणि ८.७ टक्के महिलांनी सामाजिक बदलाबाबत ट्विट केले. सर्वेक्षणामध्ये भारतात शहरांनुसार महिलांचे ट्विट करण्याचे विषय बदलत असल्याचे स्पष्ट झाले. बंगळुरुमधील सर्वाधिक महिलांनी सामाजिक बदल आणि आव्हाने याविषयावर ट्विट केले. तर चेन्नईतील महिलांनी सेलिब्रिटी क्षण, क्रिएटिव्ह विनोद, आणि दररोजच्या घडामोडीवर, तर गुवाहाटीमधील महिलांनी पॅशन, आणि चालू घडामोडींवर सर्वाधिक ट्विट केले. त्याचप्रमाणे मनात असणाऱ्या गोष्टी ट्विटवर सांगण्यात मदुराई आणि मुंबईतील महिला आघाडीवर आहेत.


हेही वाचा- यंदाच्या हिवाळ्याची १२० वर्षातल्या सर्वात उबदार थंडीचा हंगाम म्हणून नोंद, उकाडाही ‘हॉट’ असणार

- Advertisement -

 

- Advertisement -