Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Holi 2021 : लखनवी बाहुबली करंजी पाहिलेय का ? टेस्ट तो बनता...

Holi 2021 : लखनवी बाहुबली करंजी पाहिलेय का ? टेस्ट तो बनता है

तब्बल दिढ किलो वजनाची ही बाहुबली करंजी घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्राहकांनी मिठाईवाल्याच्या दुकानात गर्दी केली आहे.

Related Story

- Advertisement -

भारतात प्रत्येक सणादिवशी मिठाईला खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणाला मिठाई हवीच. होळीच्या दिवशी पुरळपोळीचे खास महत्त्व आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी होळीला कंरज्याही तयार केल्या जातात. होळीच्या मुहूर्तावर लखनऊच्या एका दुकानदाराने चक्क बाहुबली कंरजी तयार केली आहे. कंरजीला हिंदी भाषेत गुजिया असेही म्हणतात. ही भली मोठी बाहुबली करंजी पाहून खवय्येही हैराण झाले आहेत. सध्या या बाहुबली कंरजीची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु आहे. तब्बल दिढ किलो वजनाची ही बाहुबली करंजी घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी ग्राहकांनी मिठाईवाल्याच्या दुकानात गर्दी केली आहे.

लखनऊ येथे असलेल्या छप्पन भोग या दुकानात ही बाहुबली करंजी खाण्यासाठी उपलब्ध आहे. खास होळीच्या मुहूर्तावर त्यांनी ही करंजी तयार केली आहे. साधारण:पणे करंजी ४ इंचाची असते. पण बाहुबली करंजी तब्बल १४ इंचांची आहे. या करंजीची किंमत तब्बल १२०० रुपये इतकी आहे. काही स्पेशल पदार्थांचा वापर करुन ही बाहुबली करंजी तयार करण्यात आली आहे. बदाम, पिस्ता, साखर, केसर अशा अनेक पदार्थांपासून बाहुलबी करंजी तयार करण्यात आली आहे. ही कंरजी तळण्यासाठी २५ मिनिटे लागली असे दुकानाचे मार्केटिंग हेडनी सांगितले आहे. याआधीही या ठिकाणी बेबी करंजी तयार करण्यात आली होती. त्या करंजीचा आकार फक्त १.५ इंच इतका होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhappan Bhog (@chhappan_bhog)

- Advertisement -

दुकानाच्या मार्केटिंग हेडने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ग्राहकांनी दुकानाला खूप चांगले प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दरवेळी काही तरी नवीन तयार करण्याचा आमचा प्रयत्न असतो. बाहुबली करंजी हा एक वेगळा प्रयोग आम्ही केला त्याला ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कोरोनाच्या काळात मिठाईच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले. त्याकाळात कोरोना संदेश नावाची मिठाई आम्ही तयार केली होती त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. महामारीच्या काळात आमच्या दुकानाने ग्राहकांचा उत्साह वाढवला, असे त्यांनी सांगितेल.


हेही वाचा – Covid-19 बाधितांच्या आकडेवारीत जगभरात ‘या’ देशांचा ‘Top 4’ मध्ये समावेश
- Advertisement -