घरट्रेंडिंगHoli 2022 : रंगपंचमीला भांग चढली तर काय करायचे ?

Holi 2022 : रंगपंचमीला भांग चढली तर काय करायचे ?

Subscribe

होळीचे रंग आणखी खुलवण्यासाठी अनेक जण उत्साहात भांग पितात. पण तुम्हाला माहितीच असेल की भांग पिण्यापेक्षा भांग उरतवणं हा खरा टास्क आहे.

संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस म्हणजेच रंगपंचमी. रंगपंचमी तर होळीपेक्षा आणखी जल्लोषात साजरी केली जाते. रंगपंचमीला गुजिया, दही वडे, पापड, मटण वड्यांची जंगी पार्टी केली जाते तर भांग देखील रंगपंचमीला प्यायले जाणारे महत्त्वाचे पेय आहे. होळीचे रंग आणखी खुलवण्यासाठी अनेक जण उत्साहात भांग पितात. पण तुम्हाला माहितीच असेल की भांग पिण्यापेक्षा भांग उरतवणं हा खरा टास्क आहे. भांगेची नशा एकदा चढली की भांग तारे जमिनीवर आणते असे म्हणतात. अनेक जण २ दिवस झोपून राहतात असेही म्हणतात. मग रंगपंचमीला भांग चढली तर करायचे काय ?

भांग ही वनस्पती आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. आधी याचा औषध म्हणून वापर केला जात असे. परंतु लोकांनी पुढे याचा नशा करण्यासाठी वापर केला. भांग पिलेला माणूस काहीही करू शकतो हे आपण अनेक सिनेमांमधून किंवा प्रत्यक्ष देखील पाहिले असेल. काही लोक २-३ दिवस झोपून राहतात. काही लोक तासतास हसत सुटतात, व्यक्तीचे स्वत:वरील नियंत्रण सुटते. अशा व्यक्तींना आवरणे बऱ्याचदा डोकेदुखी ठरते. पण तुम्हाला ही डोकेदुखी कमी करायची असल्यास काळजी करू नका लगेचच करा हे घरगुती उपाय.

- Advertisement -
  • भांग प्यायल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नका. भांग उतरवण्यासाठी भाजलेले चणे खा. चढलेली भांग लगेचच उतरेल.
  • तुरीची कच्ची काळ वाटून पाण्यातून प्यायल्यास भांग लगेच उतरते.
  • भांग उतरवण्यासाठी संत्र, लिंबू, दही, ताक यासारखे आंबट पदार्थ खा.
  • अनेक जण भांग उतरावी म्हणून तुप देखील खातात. शुद्ध तुपाचे सेवन केल्यास भांग उतरण्यास मदत होते.
  • त्याचप्रमाणे मोहरीचे तेल कानात घातल्याने देखील भांग चटकन उतरते असे म्हणतात.

हेही वाचाHoli 2022 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -