Holika Dahan 2022 : होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामे; होऊ शकते मोठे नुकसान

होळी सणाला आता काहीच दिवस बाकी आहेत.  फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र माहिन्याच्या प्रतिपदा तिथीला धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते.

Holika Dahan 2022 Do not do these work by on the day of Holika Dahan vastu tips and upay
Holika Dahan 2022 : होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामे; होऊ शकते मोठे नुकसान

होळीच्या 8 दिवस आधी होणाऱ्या होलाष्टकला सुरुवात झाली आहे. होळी सणाला आता काहीच दिवस बाकी आहेत.  फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र माहिन्याच्या प्रतिपदा तिथीला धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते.

होलिका दहनामागे एक पौराणिक कथा आहे. असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपाचा पुत्र प्रल्हाद भगवान श्री विष्णूचा परम भक्त होता. वडिलांनी वारंवार सांगूनही प्रल्हाद काही विष्णूची भक्ती सोडायला तयार नव्हता. दैत्य पुत्र असूनही नारद मुनींच्या शिक्षेमुळे प्रल्हाद विष्णू भक्त झाला. असुराधिपती हिरण्यकश्यपाने आपल्या पुत्राला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी भगवान श्री विष्णूंनी प्रल्हादाची रक्षा केली. विष्णूच्या आशिर्वादामुळे प्रल्हदाच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नव्हतं. परंतु असे असताना देखील हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत.

असूर राजाची बहिण होलिका हिला भगवान श्री शंकरांकडून अशी चादर मिळाली होती जी ती अंगावर ओढल्यानंतर अग्नीपासून रक्षण होऊ शकते. हिरण्यकश्यपाने प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला आगीत टाकण्याची योजना आखली.   होलिका त्याला मांडीवर घेऊन चितेवर बसली. दैवयोगाने होलिकाची ती चादर प्रल्हादाच्या अंगावर पडली आणि त्याचा जीव वाचला आणि होलिकाचा मृत्यू झाला.

होळीच्या ८ दिवस आधी प्रल्हादाला कैदेत ठेवून त्याचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे या आठ दिवसांना होलाष्टक असे म्हणतात. या दिवसात शुभ काम करणे वर्ज्य मानले जाते. ज्योतिषानुसार, या दिवसात ग्रहांचा स्वभाव उग्र असतो त्यामुळे मनाप्रमाणे परिणाम होऊ शकत नाहीत. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी काही कामे करणे टाळा.

  • होलिका दहनाच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकतो.
  • होलिका दहना दिवशी केस मोकळे सोडू नका.
  • होलिका दहनाच्या रात्री कोणाच्याही घरी जेवू नका.
  • या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करुन बसू नका.
  • त्याचप्रमाणे शिळे अन्न देखील खाऊ नका.
  • ज्यांना पुत्र प्राप्ती झाली आहे त्यांनी होलिका दहन करू नये. कोणत्याही पंडितच्या मार्फत होलिका दहन करावे.
  • नवविवाहीत स्त्रियांनी होळी जळताना पाहू नये. स्त्रीयांच्या आयुष्यात अनेक समस्या येतात असे म्हटले जाते.
  • होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका.
  • या दिवशी सूनसान ठिकाणी जाऊ नका.

हेही वाचा – Holi 2022 : ‘होळी’साठी वृक्षतोड करण्यास सक्त मनाई; वृक्षतोड केल्यास दंड आणि कैदेची शिक्षा