घरट्रेंडिंगबिल्डरने स्विमिंग पूलच्या जागी दिला प्लास्टिकचा निळा कागद!

बिल्डरने स्विमिंग पूलच्या जागी दिला प्लास्टिकचा निळा कागद!

Subscribe

या बिल्डरने केलेल्या फसवणुकीमुळे सर्व इमारतीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.

वरील फोटोमध्ये पाहून तुम्ही देखील नक्कीच आकर्षित झाला असला. हा फोटो आहे चीन मधील. अनेक बिल्डरने फसवणूक केल्याच्या केस आपण ऐकल्या असतील. मात्र ही केस ऐकल्यानंतर तुम्हाला देखील हसू अनावर होणार नाही. चीनमधल्या एका बिल्डरने इमारतीतील मालकांना इमारती बाहेर ‘पार्क व्ह्यू’, ‘पार्किंग साईट’ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या बिल्डरने चक्क पार्क व्ह्यूमधील स्विमिंग पूल ऐवजी प्लास्टिकचा निळा रंगाचा कागद त्या जागी ठेऊन घर मालकांची फसवणूक केली आहे.

Homebuyers promised ‘park views’ from new development get bright blue plastic lake instead
या इमारती खालील प्लास्टिकचे स्विमिंग पूल

ही इमारत जंगलाच्या मध्यभागी वसलेली आहे, असं घर मालकांना सांगण्यात आले होते. मात्र या जंगलात साधे खडक, झाडे काहीच नसल्याचे समजलं आहे. झाडांची जागी छोटी छोटी झुडपे आणि गवत असून पिवळ्या रंगाच्या चिखल्याने इमारतीखालील ब्लॉक तयार केले आहेत. तसंच काही ठिकाणी झाडे असल्याचं सांगून तिथे रिकामी क्षेत्र आहे. या सर्व धक्कादायक गोष्टीमुळे या इमारतीमधील सर्व मालक संतापले आहेत.

- Advertisement -

तिथल्या एका मालकाने असं सांगितलं की, मी तिथल्या स्विमिंग पूलमध्ये गेलो तर तिथे ते अस्तित्वाच नव्हतं. झाडे देखील तिथे नव्हती. असे अनेक अनुभव प्रत्येक इमारती मधील प्रत्येक मालकाला आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती सुधारली जाईल असे सांगितले आहे.


हेही वाचा – कुत्र्याच्या शौचापासून बांधकामाच्या विटा! अत्यंत स्वस्त पर्याय!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -