घरट्रेंडिंगVideo Viral: धावत्या दोन ट्रेनच्यामध्ये अडकलेल्या घोड्याने स्वतःचा वाचवला असा जीव; पाहा...

Video Viral: धावत्या दोन ट्रेनच्यामध्ये अडकलेल्या घोड्याने स्वतःचा वाचवला असा जीव; पाहा थरारक व्हिडिओ

Subscribe

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही साध्य करायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, स्वतःला वर विश्वास ठेवा. कारण कोणत्याही कामात यश मिळण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे असते. ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आयुष्यातल्या गोष्टी साध्य करण्यापूर्वी डगमगतो. तसेच जर व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणत्याही समस्यांना तो हसत-हसत सामोरे जातो. जर तुम्हाला आम्ही सांगत असलेल्या या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर हा घोड्याचा व्हिडिओ नक्की पाहा. या घोड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

या व्हिडिओमध्ये अचानक समोर आलेल्या दोन ट्रेनमध्ये घोडा अडकलेला दिसत आहे. दोन्ही धावत्या ट्रेनच्यामध्ये अडकलेला घोडा पाहून ट्रेनमधले प्रवास ओरडू लागतात. जो घोडा पहिला हळूहळू धावत होता, तो प्रवाशांच्या आवाजाने वेगाने धावू लागतो. लोकांच्या आवाजामुळे तो घोडा कोणताही रस्ता न बदलता सरळ स्वतःच्या मार्गाने धावत राहतो आणि शेवटी तो दोन्ही धावत्या ट्रेनच्यामधून सुखरुप वाचतो.

- Advertisement -

व्हिडिओ पाहू तुम्ही अंदाज लावू शकता की, अशा परिस्थितीत कोणताही माणूस आपले भान गमावतो. परंतु घोड्याने एक प्राणी असूनही आपला विश्वास डगमगायला दिला नाही. जर घोड्याचा पाय चुकूनही घसरला किंवा दुसऱ्या जागी पडला असताना तर त्याचा जीव गेला असता. पण असे काही झाले नाही.

या व्हिडिओमधून हेच समजते की, जेव्हा एक प्राणी कठीण परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढू शकतो तर माणसा जवळ बुद्धी आणि विविकेचा भांडार आहे. यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Video Viral: पोलिसांच्या तपासादरम्यान कैद्याने चक्क मोबाईल फोनच गिळला; डॉक्टरांनी विना ऑपरेशन शरीराबाहेर काढला


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -