घरट्रेंडिंगहॉटस्टारची दर्शकसंख्या ८२ लाखांच्या पार

हॉटस्टारची दर्शकसंख्या ८२ लाखांच्या पार

Subscribe

आयपीएलमधील चेन्नई विरुद्ध हैदराबाद या पहिल्या क्वालिफायर सामन्यावेळी हॉटस्टार अॅपवर सुमारे ८२ लाख दर्शक लाईव्ह मॅच बघत होते. हा एक जागतिक विक्रम असल्याचे हॉटस्टार या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मोहन यांनी गुरुवारी सांगितले.
चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील रंगतदार सामन्यात डूप्लेसीसच्या नाबाद ६७ धावांनी सामन्याला चारचाँद लावले आणि चेन्नई अतिंम सामन्यात पोहोचला. या चुरशीच्या सामन्यामुळे हॉ़टस्टारने या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत जागतिक व्ह्यूवरशीपचा नवा विक्रम नोंदविला.
हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आम्ही स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दर्शकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीला आम्ही ५० लाख दर्शकांचे लक्ष्य बाळगून होतो. जे आम्ही यशस्वीपणे गाठलेसुद्धा. याआधी कोणत्याही व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅपला हा आकडा गाठता आला नव्हता. मंगळवारच्या सामन्यानंतर तर आम्ही नवीन जागतिक विक्रम केला आहे ज्याचा आम्हाला फार आनंद होतो आहे.”

हॉटस्टार, क्रिकबझ्झ अॅपची वाढती लोकप्रियता

इंटरनेट येण्यापूर्वी सामान्य लोक मॅच बघण्यासाठी टीव्ही आणि रेडिओवर अवलंबून असतं. घरापासून लांब असताना तर फोन आणि एसएमएसद्वारे लोक क्रिकेट स्कोअर जाणून घेत. मात्र, इंटरनेट आल्यानंतर नवनवीन अॅप आले आणि लोकांना असेल तिथून क्रिकेटचा लाइव्ह स्कोअरच नव्हे तर लाइव्ह कॉमेंट्रीदेखील पाहता येऊ लागली. ज्यात क्रिकबझ्झ अग्रस्थानी होते. मात्र हॉटस्टारच्या येण्याने नवा इतिहास रचला गेला आणि सर्व लोकांना असेल त्या ठिकाणाहून मॅच लाइव्ह पाहण्याचा आनंद घेता येऊ लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -