घरट्रेंडिंगउत्तर प्रदेशात चाट दुकानदार झाला 'आईन्स्टाईन', व्हिडिओ तुफान व्हायरल

उत्तर प्रदेशात चाट दुकानदार झाला ‘आईन्स्टाईन’, व्हिडिओ तुफान व्हायरल

Subscribe

सोशल मिडियावर दुकानदार आईन्टाईन गाजला

उत्तरप्रदेशातील दोन चाट दुकानदार काकांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या हाणामारीत एक चाटवाले काका चक्क अल्बर्ट आईनस्टाईन झाल्याचे दिसत आहे. उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये दोन चाट दुकानदार काकांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यावरुन वाद झाले. हे वाद इतके टोकाले गेली की दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. अनेकांनी या फ्री स्टाईल हाणीमारीचा पुरेपर लाईव्ह आनंद घेतला. त्यानंतर याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल होऊ लागले. सोशल मिडियावर तर या हाणामारीच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी अक्ष:शा डोक्यावर घेतले आहे. बागपतमधील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन चाट दुकानदारांमध्ये सोमवारी वाद झाले. या हाणीमारी बघण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या हाणीमारीत असलेल्या चाट दुकानदार काका चक्क आईनस्टाईनच्या रुपात दिसत आहेत. कारण या काकांची हेअर स्टाईल विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनच्या हेअर स्टाईलसारखीच सेम दिसत आहे. त्यामुळे सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी या चाटवाल्या काकांची तुलना आईनस्टाईन यांच्या सोबत केली आहे.

- Advertisement -

दोघांमध्ये पहिला शाब्दिक हाणामारी झाली. पण हे शाब्दिक हाणामारी नंतर टोकाला गेली आणि या दोन्ही चाट दुकानदार काकांनी एकमेकांना लाठ्या, काठ्यांनी तुडवायला सुरुवात केली. या हाणामारीच्या व्हिडिओमध्ये हिरवा कुर्ता घातलेली मोठ्या केसांची व्यक्ती दिसत आहे. हीच व्यक्ती म्हणजे ते आईनस्टाईनरुपी काका आहे. या काकांनी एकट्याने साऱ्यांनीच धुलाई केली आहे. मात्र या धुलाईपेक्षा या काकांच्या हेअर स्टाईलचीच जोरदार चर्चा झाली. या काकांचं नाव हरेंद्र आहे.
काका हरेंद्र बागपतच्या मंडईत गेल्या ४०-५० वर्षे जुनं चाटचं दुकान चालवतात. याविषयी बोलताना त्यांनी ‘एक-दोन महिन्यांपूर्वी माझ्या दुकानासमोर आणखी एक चाटचं दुकान सुरू झालं. माझ्या दुकानात शिळ्या पदार्थांपासून चाट तयार केला जातो, असं सांगून समोरचा दुकानदार ग्राहकांना स्वत:च्या दुकानात बोलावतो. यावेळी मी विरोध करताच समोरील दुकानदार मारहाण करतो,’ असं हरेंद्र यांनी सांगितलं.

- Advertisement -

त्यांच्या केसांच्या स्टाईलबद्ल विचारले असता, मी साईबाबांचा भक्त असून दररोज साईबाबांची पूजा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन वर्षांतून एकदाच केस कापतो. हरिद्वारला जाऊन केसांना कात्री लावतो, अशी माहिती हरेंद्र यांनी दिली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रर केली. कारवाईची मागणी केली. पोलिसांनी १० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात वृत्तपत्रातील एक फोटोग्राफरही जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं सीओ आलोक सिंह यांचं म्हणणं आहे. मात्र सोशल मीडियावर हरेंद्र यांच्या ‘आईन्स्टाईन लूक’ची चर्चा आहे.


हेही वाचा- जुळ्या मुलांना जन्म देण्यासाठी १९ वर्षीय तरुणी पोहोचली रुग्णालयात अन् झालं असं

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -