घरट्रेंडिंगलग्नासाठी किती दिवस सुट्टी घेऊ शकता? कंपन्यांचे नियम काय सांगतात?

लग्नासाठी किती दिवस सुट्टी घेऊ शकता? कंपन्यांचे नियम काय सांगतात?

Subscribe

तुम्ही लग्नाची सुट्टी एकदाच घेऊ शकता. संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या एकूण कालावधीत तुम्ही लग्नाच्या सुट्टीसाठी एकदाच अर्ज करू शकता.

दिवाळीत तुळशीचं लग्न लागलं की महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लग्नाचा सिजन सुरू होतो. यंदा लग्नसराईचे एकूण ५८ मुहूर्त आहेत. त्यामुळे वधू-वरांच्या पालकांची आतापासूनच मंगल कार्यालय, केटरर्सचे बुकिंग करण्यास लगबग सुरू झाली आहे. अशीच लगबग सुरू आहे ती लग्नाची सुट्टी घेण्यास. जर तुमचंही लग्न येत्या सिजनमध्ये होणार असेल आणि तुम्हालाही लग्नाच्या सुट्टीची चिंता वाटत असेल तर आम्ही तुम्हाला लग्नासाठी सुट्ट्या (Marriage Leave) ग्राह्य धरल्या जातात का? तुम्ही किती दिवस सुट्टी घेऊ शकता याची सर्व माहिती देणार आहोत. (How many days off can you take for a wedding? What do the rules of companies say?)

हेही वाचा – यंदाच्या लग्नसराईचे ५८ मुहूर्त; मे महिन्यात सर्वाधिक १४

- Advertisement -

काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लग्नाची खास सुट्टी दिली जाते, त्याला मॅरेज लिव्ह असं म्हटलं जातं. मेल्टा, विएतनामसारख्या देशात लग्नाची सुट्टी कायदेशीर आहे. तर, भारतासह अनेक देशात लग्नाची सुट्टी अद्यापही कायदेशीर करण्यात आलेली नाही. पण तरीही, भारतात १५ दिवसांपर्यंतची लग्नाची सुट्टी ग्राह्य धरली जाते. यासाठी सर्वंच कंपन्यांचे स्वतंत्र नियम असतात. काही कंपन्यांमध्ये लग्नासाठी तीन दिवसांची भरपगारी सुट्टी दिली जाते. यासाठी एचआर विभागात तुम्हाला तुमची लग्न पत्रिका सादर करावी लागते.

महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही लग्नाची सुट्टी एकदाच घेऊ शकता. संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या एकूण कालावधीत तुम्ही लग्नाच्या सुट्टीसाठी एकदाच अर्ज करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा आयुष्याचा जोडीदार निवडताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

तुम्ही फक्त पहिल्याच लग्नासाठी लग्नाची सुट्टी मागू शकता. समजा, एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लग्नासाठी सुट्टी घेतली असेल तर ती सुट्टी मान्य केली जाईल. लग्नासाठी पाच वर्षांनी ते लग्न तुटलं आणि पुन्हा लग्न करण्याचा विचार केल्यास आणि तेव्हा संबंधित कर्मचारी दुसऱ्या कंपनीत काम असेल तरी त्याला सुट्टी मिळू शकणार नाही. म्हणजेच, कोणत्याही कारणाने तुमचं लग्न मोडलं असेल तरीही तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी सुट्टी घेऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला पगारावर पाणी सोडून सुट्टी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – तुळशी विवाह पार पडताच सुरू होणार लग्नकार्य; जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त

समजा तुमच्या लग्नाच्या काळातच तुमच्या ऑफिसमध्ये वर्क प्रेशर असेल आणि त्यामुळे कंपनी तुम्हाला लग्नाची सुट्टी देऊ शकत नसेल तरी कंपनी तुम्हाला वेगळी सुविधा पुरवू शकते. तुम्ही लग्नापुरती लहान सुट्टी घेऊ शकता. वर्क प्रेशर संपल्यानंतर तुम्ही हनिमूनसाठी सुट्टी घेऊ शकता. ती सुट्टी घेऊन तुम्ही फिरायला जाऊ शकता. फक्त ही सुट्टी तुम्ही लग्नाच्या आठ आठवड्यांच्या आत घेतल्यास तुम्हाला सुट्टी मान्य होऊ शकेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -