घरट्रेंडिंगअरे व्वा! आता WhatsApp मधून डिलीट झालेले फोटो, व्हिडीओ पुन्हा मिळणार

अरे व्वा! आता WhatsApp मधून डिलीट झालेले फोटो, व्हिडीओ पुन्हा मिळणार

Subscribe

WhatsApp मधून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ तुम्हाला पुन्हा सहज मिळू शकतात.

Whatsapp आपल्या ग्रहाकांसाठी सतत काहीतरी नवीन प्रयोग करत असतं. Whatsapp चॅटींग, इमोजी, व्हिडीओ कॉलिंग यांसारख्या सुविधांबद्दल नाविण्यपूर्ण बदल केले जातात. आता पुन्हा एकदा whatsapp ने तुमच्यासाठी खास अशी सुविधा आणली आहे. ही सुविधा तुमची चिंता दूर करणार आहे. कारण बऱ्याचदा आपल्याकडून whatsapp वर आलेले महत्त्वाचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट होतात. त्यानंतर आपल्याला स्वत:चाही राग येतो. कारण आपल्याला हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ त्यावेळेस मिळत नाही. मात्र, आता काळजी करु नका. कारण तुम्हाला व्हिडीओ आणि फोटो डिलीट झाल्यानंतर ही पुन्हा मिळवता येणे शक्य होणार आहे.

Whatsapp मधील हा डेटा ३० दिवसांच्या आत तुम्ही पुन्हा डाऊनलोड करु शकता. मात्र, १ महिन्याच्या कालावधीनंतर हा डेटा Whatsapp सर्व्हरवरुन गायब होतो.

- Advertisement -

डिलीट केलेले फोटो पुन्हा कसे मिळवाल?

एखाद्या युजर्सने संपूर्ण चॅट डिलीट केले नसेल तर फोटो पुन्हा डाऊनलोड करु शकतात. यासाठी आपल्याला चॅट ओपन करुन त्या फोटोपर्यंत स्क्रोल करावे लागेल. जो आपल्याला हवा आहे. त्यानंतर आपण तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा डाऊनलोड करु शकता. हे लक्षात ठेवा की, फोटो डिलीट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत फोटो आणि व्हिडीओ परत घेतले जाऊ शकतात.


हेही वाचा – ZOOM मिटींगमध्ये सेक्स! कॅमेरा राहिला ऑन आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -