मुंबई – या वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण आज होणार आहे. या अद्भूत खगोलीय घटनेला आपल्या मोबाईल कैद करण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल. मात्र, सूर्याकडे पाहून फोटो क्लिक करणं अत्यंत कठीण काम आहे. पण आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ग्रहणाचे फोटो काढू शकाल.
हेही वाचा – दिवाळीच्या काळात ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सूतक काळ
- सूर्यग्रहणाची फोटोग्राफी करायची असेल तर आधी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. सूर्याची किरणे आपल्या शरीर आणि डोळ्यांसाठी हानिकारक असतात. त्यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालून डोळ्यांवर सनग्लासेस लावा. तसंच, डोक्यावर टोपीही घाला.
- सूर्य ग्रहणाच्या दरम्यान निघणारे किरणे आपल्या कॅमेऱ्यासाठी हानिकारक अशतात. यासाठी कॅमेरा लेन्ससमोर एक्स रे किंवा युव्ही फिल्टर चा वापर करा. यामुळे तुमच्या कॅमेऱ्याचा सेन्सर सुरक्षित राहिली आणि कोणतंही नुकसान होणार नाही.
- सूर्य ग्रहण दरम्यान चांगला फोटो येण्यासाठी तसं चांगलं लोकेशन सेट करा. यासाठी खुल्या जागेचा शोध घ्या. अशी जागा शोधा जिथून तुम्हाला आकाश स्वच्छ दिसू शकेल. तार, पोल, इमारत किंवा इतर कोणताही अडसर येणार नाही, अशी मोकळी जागा शोधल्यास फोटो काढायला सोपं जाईल.
- फोटो काढण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करा. यामुळे तुमचा फोटो क्लिअर आणि ब्लरफ्री येईल. तसंच, फोटोची क्वालिटीही वाढते. कॅमेरा हलण्यापासून वाचण्यासाठी बिल्ट इन टायमर किंवा रिमोट शटरचा वापर करा.
- सूर्य ग्रहणाचा Time Lapse व्हिडीओ बनवल्यास जास्त फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्ही ट्रायपॉडवर तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा सेट करून घ्या. तसंच, फोनला पॉवर बँक कनेक्ट करून ठेवा. जेणेकरून टाईम लॅप्स कॅप्चर होताना मोबाईल बॅटरी संपणार नाही.
- हेही वाचा – व्हॉट्सअॅपवरून ‘या’ गोष्टी शेअर करताना सावधान, नाहीतर होऊ शकतो तुरुंगवास
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -