आपल्याकडची ५०० ची खरी नोट ओळखायची कशी? RBI ने सांगितली सोपी पद्धत

RBIसमोर एका वर्षात आलेल्या खोट्या नोटांच्या अहवालामुळे RBIने सुद्धा सावधानतेचा इशारा दिला आहे.

How to recognize real 500 note? RBI simple method
आपल्याकडची ५०० ची खरी नोट ओळखायची कशी? RBI ने सांगितली सोपी पद्धत

आपल्याकडे बऱ्याचदा खोट्या नोटा देऊन फसवणूक केली जाते. खरी आणि खोटी नोट यातला योग्य फरक आपल्या न कळल्याने आपण खोट्या नोटीला बळी पडतो. RBIने दिलेल्या माहितीनुसार, २०२० -२१मध्ये RBIआणि इतर बँकांना एकूण ५.४५ कोटीहून अधिक नकली नोट्या मिळाल्या आहेत. यात RBIने ८ हजार १०७ आणि इतर बँकांनी २ लाख ५१८ नकली नोटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे पैशांची नोट घेताना सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा ५०० रुपयांच्या बाबतीत मोठी फसवणूक केली जाते. आपल्यापैकी कित्येक जण ५०० रुपयांची खोटी नोट घेऊन घरी आले असतील. RBIसमोर एका वर्षात आलेल्या खोट्या नोटांच्या अहवालामुळे RBIने सुद्धा सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे ५०० रुपयांची नोट खरी की खोटी हे ओळखायचे कसे हे सांगितले आहे.

RBIने Paisa bolta hain या त्यांच्या अधिकृत साइटवर नोटेबद्दल माहिती दिली आहे. यात काही महत्त्वाची माहिती देण्यात आली ज्यामुळे ५०० रुपयांची खरी आणि खोटी नोट ओळण्यात मदत होणार आहे. (How to recognize real 500 note?)

५०० रुपयांची खरी किंवा खोटा नोट ओळखता पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

५०० रुपयांची नोट ही लाईटसमोर ठेवल्यास किंवा डोळ्यांच्या ४५ डिग्री अँगलवर ठेवल्यास ५०० असे लिहिलेले दिसेल.५०० हा आकडा देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला असतो. त्याचप्रमाणे नोटेच्या सेंटरमध्ये माहात्मा गांधींचा फोटो देण्यात आला आहे. ५०० रुपयांची नोट थोडी हलवल्यास सिक्योरिटी थ्रीडचा रंग हिरवा निळा दिसतो. नोटेच्या उजव्या बाजूला गवर्नर सिग्नेचर, गॅरंटी क्लॉजस,प्रॉमिस क्लॉज आणि RBIचा लोगो दिसेल. त्याचप्रमाणे तिथे महात्मा गांधींचा फोटो आणि साइडला इलेक्ट्रोटाईफ वॉटरमार्कही दिसेल. नोटेच्या उजव्या बाजूला अशोकस्तंभ देण्यात आला आहे.

नोटेच्या मागच्या बाजूला स्वच्छ भारतचा लोगो आणि स्लोगन लिहिलेले असते. तर मधल्या भागात भाषेचे पॅनल लिहिलेले असते. त्याचप्रमाणे ५०० रुपयांच्या नोटीच्या मागे ध्वजासह लाल किल्याचा फोटो प्रिंट केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोटेच्या मागच्या बाजूच्या उजव्या बाजूला एका सर्कलमध्ये ५०० लिहिलेले आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला ५ ब्लीड लाईन्स,महात्मा गांधींचा फोटो अगदी रफली प्रिंट केलेला आहे. हा भाग खासकरुन अंध व्यक्तींना समजण्यासाठी बनवण्यात आला आहे.


हेही वाचा – Fix Deposit: एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाणून घ्या विविध बँकेचे व्याजदर