घरट्रेंडिंगICU बेड मिळत नाहीय? मग घरीच उभारा ICU सेट अप,पण लक्षात ठेवा...

ICU बेड मिळत नाहीय? मग घरीच उभारा ICU सेट अप,पण लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Subscribe

घरच्या घरीही उभारा ICU सेट अप

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. पण रुग्णालयात रुग्णांना उपचारांसाठी जागाच शिल्लक नाहीय. देशातील अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड,व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, ICU बेड, औषधे नसल्याचे समोर आले आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन, ICUबेडची सर्वात जास्त गरज आहे त्या रुग्णांपर्यंत या सुविधा पोहचत नाहीत. उपचारांभावी त्यांना जीव गमवावा लागतो. अशा परिस्थितीत या सगळ्या सुविधा आपल्या घरीच असत्या तर किती बरं झाले असते असं सर्वांना वाटते. घरच्या घरीही तुम्ही ICU सेट अप उभारु शकता. घरीच सुविधा असेल तर रुग्णांला योग्य वेळी योग्य उपाचर मिळतील. पण आता हा ICU सेट अप आणायचा कुठून? हा सेट अप उभारायचा कसा? घरी उपचार करताना रुग्णांची काळजी कशी घ्यायची? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे. जेणेकरुन तुम्हाला ICU बेडसाठी रुग्णालयात वणवण करावी लागणार नाही.

होम ICU बेड तुम्हाला औषधांच्या मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ज्या ठिकाणी रुग्णालयांच्या सर्व वस्तू मिळतात त्या मार्केटमध्ये तुम्हाला होम ICU बेड देखिल मिळतो. रुग्ण जास्त गंभीर असेल तर होम ICU बेड ज्या ठिकाणी मिळवाल त्या ठिकाणीच तुम्हाला नर्स आणि इतर कामासाठी कर्मचारीही मिळू शकतात.

- Advertisement -

घरीच ICU सेट अप उभारताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

वैद्यकीय उपकरणे

घरी ICU सेट अप उभारताना अडवान्स टेक्नलॉजी असलेली उपकरणे असणे गरजेचे आहे. ज्यात IV स्टँड, पॅरा मॉनिटर,ऑक्सिजन सिलेंडर, सक्शन मशिन,अल्फा मॅटर्स,नेबुलायझेर,DVT पंप इत्यादी साहित्य असणे गरजेचे आहे.

काळजी घेणारी नर्स

घरी ICU सेट अप केल्यानंतर रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्स असणे कधीही उत्तम. त्याचप्रमाणे रुग्ण जर अत्यंत गंभीर नसेल तर कुटुंबातील व्यक्तीही रुग्णाची काळजी घेऊ शकते. परंतु कधी अचानक मेडिकल गरज भासल्यास नर्स असेल तर डॉक्टरांशी संपर्क करणे सोपे होते. त्यानुसार रुग्णाला योग्य उपचार करता येतात.

- Advertisement -

फिजिओथेरपी

रुग्ण घरी ICU बेडवर असेल तर त्याला फिजिओथेरपी करणे अत्यंत गरजेचे आहे. एका जागेवर झोपून रुग्ण कंटाळू शकतो किंवा शरीर आखडू शकते. त्यामुळे फिजिओथेरपी करणे गरजेचे आहे.

बेडसोर होणार नाही याची काळजी घ्या

ICU बेडवर सतत राहून रुग्णांना बेड सोर म्हणजेच शरीराला जखम होऊ शकते. त्यामुळे रुग्णाला नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. रुग्णाच्या शरीराला जखम झाल्यास त्याचे इनफेक्शन त्याच्या संपूर्ण शरीराला होऊ शकते.

स्वच्छता राखा

घरी ICU सेट अप केला असेल तर घराची स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. रुग्णालयासारखी स्वच्छता घरीही असणे गरजेचे आहे. त्यामुळे दररोज रुग्णाचा रुम स्वच्छ करणे गरजेचे आहे.


हेही वाचा – Covid 19 Test: लक्षणे असूनही Corona चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? महत्वाची ५ कारणे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -