घरट्रेंडिंग5Gचा आपल्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

5Gचा आपल्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

Subscribe

भारतातील प्रत्येक जण 5Gचा तंत्रज्ञानाच्या प्रतिक्षेत आहे. 4Gचा विस्तार देशभरात पसरल्यानंतर अनेक टेलिकॉम ऑपरेटर कंपन्या मोबाईलच्या टेक्नोलॉजीच्या पुढच्या जनरेशनची तयारी करत आहेत. आता देशात सरकार 5G तंत्रज्ञान आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लोकांच्या फोन आणि घराघरांमध्ये 5G तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी जोरदार काम सुरू आहे. 5G तंत्रज्ञान आल्यावर आपले आयुष्य बदलून जाणार आहे. यामध्ये Airtel प्रमुख भूमिका निभावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चाचणी केली जात आहे. अलीकडेच पहिले टेलिकॉम ऑपरेटर म्हणून Airtelने हैदराबादमधील कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G तंत्रज्ञान यशस्वीरित्या प्रदर्शित केले आणि सांगितले की, युजर्सना या तंत्रज्ञानासाठी जास्त काळ थांबावे लागणार नाही.

5G तंत्रज्ञानामुळे काय होणार बदल?

  • वर्गात बसून ग्रहांची यात्रा करणे किंवा मानवाचे शरीर व्यवस्थित जाणणे विद्यार्थ्यांसाठी VR (Virtual Reality) माध्यमातून शक्य होईल.
  • लो लेटेंसीच्या मदतीने स्मार्ट होम डिव्हाईस विना कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय घरात वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळता येईल.
  • आर्थिक आणि उपयुक्तता सेवेला जलद इंटरनेमुळे चांगले आणि सुरक्षित बनवतील.
  • कपडे, शूज, चष्मा किंवा ऑनलाईन काहीही खरेदी करण्यापूर्वी AR (Augmented reality) माध्यमातून तुम्ही घरी बसून ते ट्राय करू शकता.
  • तुमच्या डॉक्टर स्मार्टवॉचच्या मदतीने नाडीचे निरीक्षण करता येईल आणि आपल्याला सतत सतर्क करेल.
  • लो लेटेंसी आणि हाय इंटरनेट स्पीडच्या माध्यमातून तुम्ही फोनच्या APPच्या माध्यमातून कार कंट्रोल आणि पार्क करू शकता.
  • ड्रायव्हिंग करताना सेंसर तुमची आणि दुसऱ्या कारमधील कम्युनिकेशन आणखी चांगले करेल. यामुळे तुम्ही सुरक्षित पद्धतीने ड्रायव्हिंग करू शकता.
  • तीन मिनटात 4GBचा 4K व्हिडिओ डाऊनलोड करू शकता आणि कोणताही अडथळा न येता तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगीची मज्जा घेऊ शकता.
  • लो लेटेंसीच्या माध्यमातून कन्सोल क्वालिटी गेममध्ये बंदूक चालवताना लॅग न होता तुम्हाला झटपट रिस्पॉन्स मिळेल.

हेही वाचा – जिओचा नवीन धमाकेदार प्लॅन; वर्षभर मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -