Utpanna Ekadashi 2021: काय आहे उत्पत्ति एकादशीची पौराणिक कथा? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

पंडीत पुरोहितांच्या म्हणण्यानुसार, उत्पत्ति एकदशीच्या रात्री जागरण केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा होते.

myth of Utpanna Ekadashi 2021 Puja rituals and auspicious moments
Utpanna Ekadashi 2021: काय आहे उत्पत्ति एकादशीची पौराणिक कथा? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

उत्पन्ना एकादशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथीला साजरी केली जाते. यंदाची उत्पन्ना एकदाशी ३० नोव्हेंबरला आली आहे. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा अर्चा केल्याने विशेष  कृपा आशिर्वाद मिळतात. असा समज आहे की उत्पन्नी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. तुम्ही हे व्रत मनोभावे श्रद्धेने करत असाल तर त्याची उचित फलप्राप्ती नक्की होते. पंडीत पुरोहितांच्या म्हणण्यानुसार, उत्पत्ति एकदशीच्या रात्री जागरण केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा होते. उत्पत्ति एकादशी करण्यामागे एक पौराणिक रंजक कथा आहे. तुम्ही देखील उत्पत्ति एकादशीचे व्रत करत असाल तर त्याआधी ती कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

 

पौराणिक कथेनुसार, धर्माराज युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांकडे एकदशीचे कथा सांगण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्री कृष्णांनी युधिष्ठीरला कथा सांगितली. असुर मुर नावाच्या राक्षसाने जेव्हा देवांचा पराभव करुन स्वर्गात आपले बस्तान बसवले तेव्हा तिन्ही लोकात हाहाकार माजला होता. तेव्हा देव आणि ऋषीगणांनी आपली व्यथा भगवान शंकरांकडे मांडली. देव आणि ऋषीगणांची व्यस्था ऐकल्यानंतर याचे निराकरण केवळ भगवान विष्णू करू शकतात असे सांगितले. त्यानंतर सर्व देव ऋषी भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांची व्यथा मांडली. हे ऐकून भगवान विष्णू असुर मुराच्या शेकडो सेनापतींचा वध करुन विश्रांती घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले.

सेनापतींचा वध झाल्यानंतर मुर राक्षस क्रोधित झाला आणि भगवान विष्णूंना मारण्यासाठी बद्रिकाश्रम येथे पोहचला. तिथे भगवान विष्णू आराम करत होते. भगवान विष्णू विश्राम अवस्थेत असतानाच त्यांच्या शरीरातून एक कन्या उत्पन्न झाली आणि तिच्याशी असुर मुर राक्षसाची भीषण युद्ध झाले आणि या युद्धात असुर मुरा राक्षसाचा वध झाला. युद्ध संपल्यानंतर भगवान विष्णू निद्रावस्थेतून उठले आणि कन्येने केलेल्या कामावर प्रसन्न झाले. त्या कन्येला भगवान विष्णू यांनी एकदाशी असे नाव दिले. सर्व देव देवतांनी एकादशीला वंदन केले. त्यादिवसापासून उत्पन्ना एकादशी सुरू झाली आणि म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा आराधना केली आहे.

उत्पत्ति एकादशी शुभ मुहूर्त

उत्पत्ति एकादशी प्रारंभ

३० नोव्हेंबर २०२१ – सकाळी ४:१३ वाजता

उत्पत्ति एकादशी समाप्ती

१ डिसेंबर २०२१ – मध्यरात्री २:१३ वाजता

 

उत्पत्ति एकादशी पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूंची तुळस,कापूर, धूप,फूले, चंदनाने पूजा करा. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंसाठी विशेष नैवेद्य तयार करा. पूजा करताना एकादशीच्या व्रताच्या कथेचे पारायण करा.


हेही वाचा – Angarki Sankashti Chaturthi 2021: काय आहे अंगारकी चतुर्थीची कथा?