घरट्रेंडिंगहॉटेलमध्ये प्रियकरासोबत बायकोला पकडलं रंगेहाथ अन्

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत बायकोला पकडलं रंगेहाथ अन्

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये घरात सर्वजण एकत्र असल्यामुळे अनेक वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नवरा-बायकोमधील होणाऱ्या वादामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले. तर लॉकडाऊनमध्ये बायको माहेरी अडकल्याने नवऱ्याने दुसरीसोबत लग्न केल्याचे देखील समोर आले. म्हणजेच एकंदरीत कोरोनाच्या काळात नवरा-बायकोमधील वादाच्या घटना वाढल्याचे दिसले. दरम्यान फरीबादमध्ये नवऱ्याने बायको आणि तिच्या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे.

नक्की काय घडले?

फरीबादमध्ये एका हॉटेलमध्ये नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर रागाच्या भरात नवऱ्याने बायकोला आणि तिच्या प्रियकराला जोरदार मारहाण केली. या मारहाणीदरम्यान हॉटेलमध्ये गोंधळ पाहून लोकांची गर्दी जमली. मग यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि नवऱ्याने बायकोला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

माहितीनुसार, पलवलच्या असावती गावाचा रहिवासी असलेल्या तरुणाचे लग्न ३ वर्षापूर्वी फिरोजपूर कलां गावातील तरुणीशी झाले होते. लग्नापूर्वी तरुणीचे गावातल्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणी लग्नानंतरही प्रियकराला भेटण्यासाठी लपून छपून येत होती. एके दिवशी नवऱ्याला त्याची बायको प्रियकराला भेटायला जात असल्याचे समजले. त्यानंतर त्या दोघांमध्ये सतत भांडणं सुरू झाली. एके दिवशी बायको त्या प्रियकरासोबत एक दिवसासाठी गायब झाली असल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे. त्यानंतर बायकोच्या कुटुंबियांनी तिचा तपास केला असता ती प्रियकरासोबत भेटली. जेव्हा हीच गोष्ट नवऱ्याला समजली तेव्हा बायकोसोबत त्याने राहण्यास नकार दिला. मग दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर पुन्हा हे नवरा बायको एकत्र राहायला लागले.

काही दिवसानंतर बायको वडिलांना पायाला लागल्यामुळे भावासोबत माहेरी गेली. माहेरी आल्यानंतर तिने पुन्हा प्रियकरासोबत संपर्क साधला. मग ती नवऱ्याला सतत टाळायला लागली. सोमवारी नवऱ्याने बायकोची हालचाल विचारण्यासाठी मेव्हण्याला फोन केला. तेव्हा त्याने बहीण आईसोबत कपडे घेण्यासाठी बल्लभगढला गेल्याचे सांगितले. त्यानंतर जवळपास १० वाजता चुलतभावाचा नवऱ्याला फोन आला. त्याने वहिणी एका तरुण मुलासोबत बल्लगभढच्या चावला कॉलनीमध्ये फिरत असल्याचे सांगितले. मग नवऱ्याने चुलत भावाला बायकोचा पाटलाग करायला सांगितले. त्यावेळेस तिला शोधताना नवरा आणि त्याचा चुलतभाऊ एका हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्याने त्यावेळेस बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. मग हॉटेलच्या बाहेर दोघांनाही आणून मारहाण केली. या घटनेच्या अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी येऊन बायको आणि तिच्या प्रियकराला घेऊन चौकीत गेले.

- Advertisement -

या संदर्भात चावला कॉलनी पोलिस चौकी प्रभारी कृष्णा दहिया यांनी सांगितले की, ‘महिलेच्या आणि प्रियकराच्या कुटुंबाला बोलावले आहे. दोघांच्या कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहेत.’ पोलिसांचे म्हणणे आहे की, ‘जर त्यांना तक्रार मिळाली तर ते कारवाई करतील.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -